आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांमध्ये कायदेविषयक जागरूकता हवी : रहाटकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली  - महिलांविषयीच्या विविध कायद्यांबाबत जागरूकता निर्माण होण्याची गरज असून यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्न करत आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी बुधवारी दिली.  
 
महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे अायाेजित कार्यक्रमात बाेलताना रहाटकर म्हणाल्या, महिलांनी आज विविध क्षेत्रांत प्रगती केली आहे. मात्र, अनेक महिला आपल्या अधिकारांपासून वंचित असल्याचेही चित्र आहे. महिला सुशिक्षित झाल्या, पण त्यांना आपल्या अधिकारांची जाणीवही होण्याची गरज आहे. आपल्यासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यांबाबत महिलांमध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे. 
 
महिलांविषयक कायदे, योजना यांसोबतच स्वअधिकाराचे ज्ञान महिलांनी करून घेतले पाहिजे. असे ज्ञान कुटुंबातूनच देण्याची सुरुवात व्हायला हवी. आईने आपल्या मुला-मुलींना कायदेविषयक जुजबी ज्ञान दिले पाहिजे. महाराष्ट्रातील सर्वच महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींना महिला सुरक्षाविषयक कायद्यांबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. आगामी काळात राज्यातील सर्व शाळांमध्ये, शासकीय, गैरशासकीय कार्यालयांमध्येही असे प्रशिक्षण देण्यात आहे. सर्वोच्च न्यायालयाने महिला सुरक्षा कायद्याविषयक जाहीर केलेल्या विशाखा मार्गदर्शकेची  राज्यामध्ये अंमलबजावणी होत आहे.  
 
रहाटकर यांनी ‘महिलांची सुरक्षा आणि आपण’, ‘ॲसिड हल्ला पीडित महिला व समाजाचा दृष्टिकोन’ या विषयावर विविध घटना व उदाहरणांचे दाखले दिले. त्या म्हणाल्या की, ‘ॲसिड हल्ला पीडित महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी  राज्य महिला आयोगाने पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी देण्यात येणारी आर्थिक मदत ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. पीडितांच्या पुनर्वसनासाठी विविध प्रशासकीय यंत्रणा आणि खासगी संघटनांना  सहभाग करुन घेण्यात येत आहे, असे रहाटकर यांनी या प्रसंगी सांगितले. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...