आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गीता फोगाटची दोन अपत्यांसाठी शपथ; म्हणाली, आईला मुलगा हवा होता, म्हणून आम्हा चौघींचा जन्म

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझ्या आईला मुलगा हवा होता आणि तिच्या या इच्छेखातर आम्हा चौघींचा जन्म झाला - Divya Marathi
माझ्या आईला मुलगा हवा होता आणि तिच्या या इच्छेखातर आम्हा चौघींचा जन्म झाला
नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू गीता फोगाट आता लोकसंख्या नियंत्रणासाठी महिलांना जागरूक करणार आहे. सोमवारी तिने दोनच मुलांना जन्म देण्याची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर गीता म्हणाली की, मी दोनच मुलांना जन्म देईन. मग ती मुलगी असो की मुलगा. माझ्या आईला मुलगा हवा होता आणि तिच्या या इच्छेखातर आम्हा चौघींचा जन्म झाला. मात्र, मी व माझा पती पवन ठाम आहोत. यासाठी कुटुंबाचीही मला साथ आहे. दोनच अपत्यांबाबत राष्ट्रीय धोरण तयार झाल्यास मला अानंदच होईल. सरकारने यावर कायदा केला पाहिजे. मुलीच्या जन्माबाबतचे गैरसमज दूर केले पाहिजेत. यासाठी स्त्री भ्रूणहत्येविरोधात कडक पावले उचलली पाहिजेत. एखाद्याला २ मुले असली तरी तो मुलगी दत्तक घेऊ शकेल. देशात आवश्यक स्रोत घटत आहेत, त्यामुळे वाढती लोकसंख्या चिंताजनक आहे. महिलांना या कार्यात सामावून न घेतल्यास ही समस्या आणखी वाढू शकते. यासाठी त्यांच्यात जागरूकता निर्माण केली पाहिजे.
 
योगेश्वर दत्तनेही दोन अपत्यांच्या जन्माची शपथ घेतली. तो म्हणाला, लोकसंख्या कमी करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे आले पाहिजे. यामुळे येणारी पिढी बळकट आणि आनंदी होईल. देशाच्या प्रगतीचा विचार करण्याची जबाबदारी केवळ नेते, अधिकाऱ्यांची नसते.ती आपणा सर्वांचीच आहे. सर्वसामान्य नागरिकांनीही दोन अपत्यांचे धोरण स्वीकारले पाहिजे. मुली मुलांपेक्षा कमकुवत किंवा पिछाडीवर असतात असे कोणी म्हणायची गरज नाही. त्यामुळे मुलगा असो की मुलगी, सर्वांना समान प्रेम व योग्य मार्गदर्शन मिळायला हवे. मंगळवारी जागतिक लोकसंख्या दिन साजरा होत आहे. त्याआधी सोमवारी येथील काॅन्स्टिट्यूशन क्लबमध्ये भारत फॉर पॉप्युलेशन मोहिमेअंतर्गत परिषद झाली. टॅक्स पेयर असोसिएशन ऑफ भारतने(टीएएक्सएबी) या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात गीता फोगाट, योगेश्वर दत्त, एम.एस. स्वामिनाथन आदी उपस्थित होते. या वेळी ‘मैं भारत बोल रहा हूं’ थीम साँग लाँच झाले.
 
भारताची लोकसंख्या जगाच्या १८%
संयुक्त राष्ट्रानुसार भारताची लोकसंख्या २०२४ पर्यंत चीनपेक्षा जास्त होईल. एवढेच नव्हे तर २०३० पर्यंत भारताची लोकसंख्या १.५ अब्ज होण्याची शक्यता आहे. चीनची लोकसंख्या १.४१ अब्ज व भारताची १.३४ अब्ज आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येत चीन अव्वल आहे. भारताची लोकसंख्या २०५० नंतर घटण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...