आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात मोठे शस्‍त्र प्रदर्शन, पॉइंटरगनपासून ते तोफेपर्यंत, बघा PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली: दिल्‍लीच्‍या प्रगती मैदानावर सर्वात मोठे शस्‍त्र प्रदर्शन सुरु आहे. प्रदर्शनाचे हे आठवे वर्ष असून त्‍यामध्‍ये लष्‍करातील भूदल, नौदल आणि वायूदलातील शस्‍त्रांचे प्रदर्शन भरवण्‍यात आले आहे. 30 पेक्षा जास्‍त शस्‍त्रउत्‍पादक देशांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला असून 600 शस्‍त्रांचे प्रदर्शन करण्‍यात आले आहे. रशियाच्‍या सर्वाधिक 37 शस्‍त्रउत्‍पादक कंपन्‍या सहभागी झाल्या आहे.

आशिया खंडातील या सर्वात मोठ्या शस्‍त्रप्रदर्शनाने तरुण तसेच वयोवृध्‍दांना आ‍कर्षित केले आहे. अत्‍याधूनिक रणगाडे, तोफा, रायफली, एअर पिस्‍तूल, मानवविरहीत विमाने, मानवविरहीत पाणबुड्या, लढाऊ हेलीकॉप्‍टर, क्षेपणास्‍त्र, रॉकेट इत्‍यादी शस्त्रे यात प्रदर्शित करण्यात आली आहेत. गेल्या वर्षामध्‍ये भारताने मोठ्या प्रमाणावर शस्‍त्रास्‍त्र आयात केली होती. जगातील शस्त्रास्त्र व्यापारापैकी 10 टक्के व्यवहारात भारताचा सहभाग असून, भारत हा सर्वाधिक शस्त्रास्त्र आयात करणारा देश आहे, असे स्वीडनमधील "स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थे'ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

भारताच्‍या अर्थमंत्रालयाने 2014 च्‍या अर्थसंकल्‍पात सुरक्षा बजेट कमी केले आहे. 2013 -14 च्‍या वार्षिक अर्थसंकल्‍पात 20 खरब 36 अव्‍ज रुपये होते. तरीही भारत सर्वाधिक शस्त्रे आयात करणारा देत ठरला आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, प्रदर्शनामध्‍ये ठेवलेली शस्‍त्रे...