आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरविंद केजरीवाल यांच्याकडे कोठून, कसा आणि किती येत आहे पैसा ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने (आप) काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला (भाजप) खुले आव्हान दिले आहे. पक्षाचे संयोजक केजरीवाल यांनी या दोन्ही पक्षांना मिळणारा पक्ष निधी कोठून मिळाला याची माहिती उघड करण्याचे आव्हान दिले आहे. ते म्हणाले, दोन हजार कोटी रुपये पक्षनिधी मिळविणारी काँग्रेस आणि 995 कोटी रुपये पार्टी फंड गोळा केलेल्या भाजपने जाहीर करावे त्यांना हा पैसा कसा आणि कोठून मिळाला आहे.

केजरीवाल यांनी दावा केला आहे की, 'आप'ला मिळालेल्या पै-पैचा हिशेब त्यांनी ठेवला आहे. कोणी किती पैसे दिले आणि ते कोठून आले. याची संपूर्ण माहिती 'आप'ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड केलेली आहे. 'आप'ला आतापर्यंत 45,000 दानशुर व्यक्ती मिळाले आहेत. यात अमेरिकपासून ब्रिटन पर्यंतचे आणि हाँगकाँगपासून दिल्ली पर्यंतचे लोक आहेत. दिल्लीतील रस्त्यांवर रिक्शा चालवणारे देखील यात समाविष्ट आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे निवृत्ती वेतन तर विद्यार्थ्यांनी त्यांचा पॉकेट मनी पक्षनिधीसाठी दिला आहे. केजरीवाल यांच्या 'आप'ला आतापर्यंत 11.5 कोटी रुपये निधी मिळालेला आहे.