आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - दिल्लीत आम आदमी पार्टीची राजवट येणे जवळपास निश्चित आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्यासंबंधी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल सामेवारी सकाळी 11.30 वाजता पत्रपरिषदेत घोषणा करतील. उपराज्यपाल नजीब जंग यांना भेटून 12.30 वाजता याबाबत माहिती देतील.
गेल्या आठवडाभरापासून आप जनमत अजमावत आहे. रविवारी अनेक भागांत सभा झाल्या. 128 पैकी 110 सभांत लोकांनी सत्तास्थापनेचा कौल दिला. वास्तविक दोन आठवड्यांपूर्वी लागलेल्या निवडणूक निकालात कोणालाही बहुमत मिळाले नाही. 70 सदस्यीय विधानसभेत भाजप आघाडीला 32, आप 28, तर काँग्रेसला 8 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसने विनाअट पाठिंबा देण्याची तयारी दाखवली. त्यामुळे बहुमताचा आकडा 36 वर जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.