आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलींना क्षणा-क्षणाची माहिती पुरवत होते काँग्रेसचेच चार नेते; तपासातून माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- छत्तीसगड राज्यातील काँग्रेस नेत्यांवर झालेल्या नक्षलवादी हल्ल्याची चौकशी करणा-या राष्ट्रीय चौकशी आयोगाच्या (एनआयए) टीमचे म्हणणे आहे की, या हल्ल्यात वाहनाच्या ताफ्यातील काही लोकांचा हात आहे. ही माणसे काँग्रेसच्या रॅलीसह वाहणाच्या ताफ्यात सहभागी होते. तसेच वाहनाचा ताफा कोठे आहे याची माहिती नक्षलींना क्षणाक्षणात मिळत होती. एनआयएने संबंधित भागातील कॉल डिटेल्स तपासली असता ही माहिती पुढे आली आहे.

चौकशी आयोगाच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, ही फुटीर भेदी लोक हत्येच्या षड्यंत्रात सामील होते. त्यांनी केवळ रॅलीचा मार्गच नाहीतर कोणत्या गाडीत कोण बसले आहे याचीही माहिती पुरवली होती. अशा चार लोकांची ओळख पटवण्यात आली आहे जे नक्षलींच्या संपर्कात होते. यातील दोघे काँग्रेसच्या ताफ्यात प्रत्यक्ष होते तर दोघे फोनवरून संपर्कात होते. नेत्याचे थांबणे, कोणत्या ठिकाणी किती वाजता, गाडीचा वेग याची इत्थभूत माहिती नक्षलींना मिळत होती. चौकशी आयोगाने जगदलपूरमधील सेलफोन टॉवर्समधून त्या मार्गावरील सर्व कॉल डिटेल्स काढली आहेत. चार स्थानिक नेत्यांच्या कॉल डिटेल्सचीही तपासणी करण्यात येत आहे. घटना कशी घडली व घडवली याची पाहणी केली असता अनेक महत्त्वाचे पुरावे हाती आले आहेत.

पुढे वाचा, महेंद्र कर्मा यांच्या मुलाने कोणावर केले होते आरोप, क्लिक करा...