आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी गुंतवणूक: मिडकॅप शेअर्स देणार चमकदार परतावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आगामी काळात मिडकॅप कंपन्यांचे समभाग चांगला परतावा देण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. एम्बिट कॅपिटलने जारी केलेल्या अहवालानुसार येत्या सहामाहीत मिडकॅप कंपन्यांतील निवडक समभाग चांगला परतावा देतील. यात मदरसन सुमी,पिडिलाइट, इप्का लॅब, क्रिसिल, बर्जर पेंटस आणि सिटी युनियन बँक या सहा समभागांचा समावेश आहे. या कंपन्या लवकरच निफ्टी 50 कंपन्यांत समाविष्ट होतील. या कंपन्यांची मागील पाच वर्षांतील विक्री आणि आरओसीच्या आधारावर या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.

प्रुडेंट कॅपिटलचे तांत्रिक विश्लेषक प्रदीप हॉटचंदानी यांच्या मते, या कंपन्यांचे चार्टही अत्यंत आकर्षक आहेत आणि आगामी काळात या कंपन्या गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देण्याची शक्यता आहे.

सहा मिडकॅप समभागांवर ठेवा नजर

मदरसन सूमी 275 रुपये 378 रुपये
ही कंपनी सुमिटोमो टेक्नॉलॉजीची आघाडीची फ्रँचायझी आहे. वायरिंग हार्नेससारख्या इतर क्षेत्रात ही कंपनी सध्या चांगली कामगिरी करते आहे.

पिडिलाइट 330 रु. 390 रु.
कंपनी विशेष रसायने निर्मिती करते. नेटवर्क उत्तम, विस्ताराच्या योजना आहेत. अनेक कंपन्या अधिग्रहित करण्याची शक्यता.
क्रिसिल 1375 रु. 1725 रु.
ही देशातील पहिली आणि सर्वात मोठी रेटिंग कंपनी आहे. कंपनी योग्य वेळी केपीओ कारभारात आल्याने मोठ्या वाढीची आणि नफ्याची अपेक्षा आहे.

इप्का लॅब 780 रु. 860 रु.
दीर्घकाळापासून कंपनी विविध प्रकारचे एपीआय मॅन्युफॅक्चरिंग (कास्ट) मध्ये बदल करते आहे. मजबूत फंडामेंटल्स, सरकारी कामे आहेत.

बर्जर पेंट्स 247 रु 290 रु.
देशातील दुसर्‍या क्रमांकाची रंग निर्मिती करणारी कंपनी. वितरकांचे जाळे वाढवून त्यांच्याशी चांगले नाते राखण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

सिटी युनियन बँक 73 रु. 100 रु.
सूक्ष्म, लघु तसेच मध्यम कंपन्यांना कर्ज देण्यावर बँकेचा भर असतो. बँकेच्या सक्षम व तगड्या व्यवस्थापनाने बँकेला सातत्याने चांगली वाढ दिली आहे. योग्य वेळी ग्राहकांना सुविधा देण्यामुळेही बँकेने कमी कालावधीत चांगले स्थान निर्माण केले आहे.