आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70 वर्षांपूर्वी मिळाले स्वातंत्र्य, जगभरातील दैनिकांनी अशी दिली होती बातमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क टाइम्सने स्वतंत्र भारताचा पहिला नकाशा छापला होता. - Divya Marathi
न्यूयॉर्क टाइम्सने स्वतंत्र भारताचा पहिला नकाशा छापला होता.
नवी दिल्ली - 15 ऑगस्ट 1947 रोजी देश जेव्हा स्वतंत्र झाला होता, तेव्हा देशात आजच्या प्रमाणे ना टीव्ही होता, ना इंटरनेट मग सोशल मीडियाचा तर प्रश्नच नव्हता. त्या काळात बातम्या फक्त वृत्तपत्र आणि काही जागी रेडिओच्या माध्यमातून प्रसारित व्हायच्या. स्वातंत्र्याला 70 वर्षे पूर्ण होत असताना आम्ही तुम्हाला सांगत आहोत स्वतंत्र भारताच्या पहिल्या दिवशी काय होती जगातील प्रसिद्ध दैनिकांची हेडलाइन.
 
फ्रंट पेजवर ही होती स्टोरी..
- स्वातंत्र्याच्या वेळी फक्त मुंबई आणि दिल्लीतच काही निवडक इंग्रजी दैनिक आणि एखाद-दुसरे हिंदी दैनिक होते.
- देशच नाही विदेशातील प्रसिद्ध दैनिकांनी भारताचे स्वातंत्र्य आणि देशातील ब्रिटिश साम्राज्याच्या अंताची बातमी आपली हेडलाइन बनवली होती.
- फ्रंट पेजवर भारताचे स्वातंत्र्य आणि पाकिस्तानच्या फाळणीची बातमी प्रामुख्याने छापण्यात आली होती.
देशातील अनेक भागात एक- दोन दिवस उशिराने दैनिके पोहोचायची. यामुळे लोकांना स्वातंत्र्याची बातमी दोन दिवस उशिरा मिळाली.
- वृत्तपत्रांच्या या दुर्मिळ प्रती आजही देशभरातील विविध संग्रहालयांत जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, देश स्वतंत्र झाला तेव्हा ही होती जगातील फेमस दैनिकांची हेडलाइन...
बातम्या आणखी आहेत...