आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय चलन रुपया दिवसेंदिवस नीचांकीचे विक्रम करीत चालला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या दरात आज आणखी 74 पैशांची घसरण झाली व रुपयाने डॉलरच्या तुलनेत 58.90 रूपयांची नीचांकी पातळी गाठली. दरम्यान, रुपयांच्या अवमूल्यनामुळे सरकार आणि आरबीआय प्रचंड चिंताग्रस्त झाली आहे. यामुळे देशात महागाई वाढण्याबरोबरच विकासाला चांगलीच खीळ बसेल, असे सांगण्यात येते आहे.
गेल्या काही दिवसात भारतात होणारी परदेशी गुंतवणूक निम्म्यावर आली आहे. त्यामुळे रुपयाची मागणी कमी-कमी होत चालली आहे तर डॉलर महाग होत चालला आहे. याचा परिणाम भारताच्या आयातीवर होत आहे. भारत मोठ्या प्रमाणात इंधन आयात करतो. रुपया घसरल्याने व डॉलर महाग होत असल्याने पेट्रोल, डिझेलची भविष्यात दरवाढ होऊ शकते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.