आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेलमध्ये टिप देतात ९६% भारतीय, ९३% फ्री वायफायच्या शोधात, ८८% हवे मोठे बाथरूम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीयांच्या पर्यटनाच्या वाढत्या सवयीच्या अहवालानंतर आता हॉटेल बुकिंग आणि हॉटेलमधील त्यांच्या व्यवहारावर एक मनोरंजक खुलासा झाला आहे. ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी एक्स्पीडियाने सोमवारी जाहीर केलेल्या ‘२०१६ हॉटेल एटिकेट्स रिपोर्ट’नुसार सुमारे ९६% भारतीय हॉटेलमध्ये राहण्यास गेल्यावर टिप देतात.
हॉटेलच्या बुकिंगसंदर्भात भारतीयांची प्राथमिकता आणि व्यवहार यासंबंधीचे विश्लेषण या अहवालात करण्यात आले आहे. एक्स्पीडियासाठी उत्तर अमेरिकेतील जीएफके कस्टम संशोधन संस्थेने गेल्या दोन वर्षांत हॉटेलमध्ये मुक्काम करणाऱ्या १,०१४ लोकांचे ऑगस्ट महिन्यात हे सर्वेक्षण करण्यात आले.

हॉटेलमध्ये मुक्कामादरम्यान चेक-आऊट करताना टिप देण्यासंदर्भातही आपला व्यवहार वेगवेगळा आहे. भारतीय पर्यटक वेगवेगळ्या कारणामुळे आनंदी होऊन टिप देत असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

या लोकांचा राग
‘प्लीज, डू नॉट डिस्टर्ब’ म्हणजेच हॉटेलमध्ये मुक्कामादरम्यान भारतीयांना विनाकारण हस्तक्षेप आवडत नाही. जर असा त्रास झाला, तर त्यांना राग येतो. सर्वेक्षणात सहभाग घेतलेल्या पर्यटकांनी अशा त्रासाचा उल्लेख केला, ज्यामुळे ते नाराज झाले.

६४% लोकांना हवी हॉटेलमध्ये जिम
आपली प्राथमिकता वेगवेगळी आहे. हॉटेलमध्ये मिळत असलेल्या सर्व सुविधांपासून पूर्णपणे समाधानी झाल्यानंतरच भारतीय रूम बुक करतात. कोणाला फ्री वायफाय हवा, तर कोणाला मोठी बाल्कनी. तीन चतुर्थांश भारतीय जकुजी किंवा टब आणि बाल्कनी असणारी रूम बुक करणे पसंत करतात.
बातम्या आणखी आहेत...