आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतर बँकांच्या ATM चा केवळ दोन वेळा मोफत वापर, यासह तीन महत्त्वाच्या बातम्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : प्रतिकात्‍मक

मुंबई - शहरांमध्ये एटीएम कार्डधारकांना आता इतर बँकांच्या एटीएममधून केवळ दोन वेळात मोफत पैसे काढता येणार आहेत. त्यानंतरच्या प्रत्येक टान्झेक्शनवर 20 रुपयांचा चार्ज लागेल. आधी ही सुविधा पाच वेळा पैसे काढण्यासाठी मिळत होती. ग्रामीण भागांत मात्र जुनाच नियम लागू असेल. दरम्यान, नरेंद्र मोदी सरकारने सरकारी कामासाठी लागणारी कागदपत्रे अटेस्टेड करण्यासाठी गॅझेटेड ऑफिसर किंवा नोटरीची गरज राहणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गांवर ताशी 100 किमी वेगाला मंजुरी देण्याचा निर्णयही घेतला आहे.

दोनच वेळा मोफत एटीएम वापर
रिझर्व्ह बँकेने सर्व कार्डधारकांना दिलेल्या निर्देशांनुसार केवळ दोनच वेळा इतर बँकांचे एटीएम वापरता येतील. त्यासाठी आरबीआयने बँकांकडे ग्रामीण भागांतील एटीएमसंदर्भात माहितीही मागवली आहे. बँकांनी अनेक दिवसांपासून मोफत ट्रान्झेक्शनची संख्या कमी करण्याची मागणी केली होती. ही सूट दिल्याचा चुकीचा वापर केला जात असून ग्राहक गरज नसताना अनेकदा पैसे काढत असल्याचे बँकांचे म्हणणे होते. तसेच आरबीआयच्या नव्या दिशानिर्देशांमुळे चार्ज वाढवण्यात आल्याचेही बँकांनी म्हटले आहे.
पुढे वाचा - अशाच महत्त्वाच्या आणखी दोन बातम्या