आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपण संघर्षात गेले, आता सत्तेची किल्ली त्यांच्या हाती; यांच्या नेतृत्वात अझरने खेळला होता रणजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जे. जयललिता, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री
बालपण संघर्षात गेले, आता सत्तेची किल्ली त्यांच्या हाती
चर्चेचे कारण -जयललिता सरकारने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांच्या सुटकेचा विवादास्पद निर्णय घेतला आहे.
जन्म - 24 फेब्रुवारी 1948, म्हैसूर
वडील - जयराम (वकील), आई संध्या (अभिनेत्री)
शिक्षण - बंगळुरू आणि चेन्नईमधून शालेय शिक्षण, स्टेला मेरिय कॉलेज, चेन्नईमधून कायद्याचे शिक्षण (अर्धवट).
म्हैसूरमध्ये जन्मलेल्या जयललिता यांचे वडील वकील होते. जयललिता यांचे जन्मनाव ‘कोमालावल्ल्ली’ असे होते. अय्यंगार परंपरेनुसार दोन नावे ठेवली जातात. त्यांचे आजोबा म्हैसूरचे महाराजा जयचमराजेंद्र वुडेयार यांच्या दरबारी वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. महाराजांसोबतचे त्यांचे नातेसंबंध दर्शवण्यासाठी ते कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या नावापुढे जय लावायचे. जयललिता दोन वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे आई वेदवती मुलगा जयकुमार आणि मुलगी जयललिता यांच्यासह त्यांच्या माहेरी बंगळुरूला आल्या आणि टायपिस्टचे काम करू लागल्या. नंतर जयललिता यांची मावशी विद्यावती (अभिनेत्री अंबुजम) यांनी वेदवती यांना चित्रपटांत काम करण्यासाठी चेन्नईला बोलावून घेतले. त्यानंतर वेदवती यांनी ‘संध्या’ नावाने चित्रपटात अभिनय सुरू केला.
जयललिता यांना वकील व्हायचे होते; पण 1964 मध्ये आईच्या आग्रहामुळे त्यांनी कायद्याचे शिक्षण अर्धवट सोडून चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले. 1964 मध्ये त्यांनी पहिल्यांदा कन्नड चित्रपटात, तर 1965 मध्ये तामिळ चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले व लवकरच लोकप्रियता मिळवली. त्यांनी माजी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांचे पुत्र शंकर गिरी यांच्या ‘अ‍ॅपिस्टल’ या इंग्रजी चित्रपटातही अभिनय केला. अभिनेता धमेंद्र यांच्यासोबत केलेला ‘इज्जत’ हा चित्रपट गाजला होता. तामिळी चित्रपटांतील सुपरस्टार एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांच्या व्यक्तिमत्त्वाने जयललिता बर्‍याच प्रभावित होत्या. त्यांच्यासोबत त्यांनी 28 चित्रपटांमध्ये अभिनय केला. 1982 मध्ये एमजीआरसोबत जयललिता यांनी अन्नाद्रमुक पक्षात प्रवेश केला. उत्कृष्ट इंग्रजी बोलत असल्यामुळे एमजीआर यांनी त्यांना राज्यसभेत पाठवले. 1991 मध्ये काँग्रेसच्या समर्थनाने त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या; पण 1996 मध्ये त्यांचा पराभव झालला. त्या वेळी डीएमकेने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. ते प्रकरण अद्यापही न्यायालयात आहे. यामुळे व्यथित झालेल्या जयललितांनी यानंतर कधीच दागिने न घालण्याचा निश्चय केला. कोट्यवधींची आभूषणे, 10 हजारांपेक्षा जास्त साड्या आणि 750 जोडी चपला अशा राजेशाही थाट असलेल्या जयललिता यांनी घेतलेला हा निर्णय त्या वेळी खूप गाजला होता. 14 वर्षांपर्यंत त्यांनी हा निश्चय पाळला; पण 2011 पासून त्यांनी दागिने घालायला सुरुवात केली.

पुढील स्लाइडमध्ये, अझरुद्दीनने यांच्या नेतृत्वात खेळला होता रणजी सामना