आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक तप दुष्काळवाडाच, पुढची दहा वर्षेही मराठवाड्यात अल्‍प पावसाचा अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/ औरंगाबाद - देशभरात दणक्यात पाऊस सुरू असताना अद्यापही कोरडाच राहिलेल्या मराठवाड्यात पुढची १० वर्षेही अवर्षणामुळे दुष्काळाचे संकट कायम राहील, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. स्कायमेट या खासगी संस्थेच्या सुधारित अंदाजानुसार, मराठवाडा, उत्तर कर्नाटक, रायलसीमा या भागात यंदा अत्यंत कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विषुववृत्तानजीक हिंदी महासागराचे वाढते तापमान व युरेशिया खंडात चीन परिसरातील थंड हवामानामुळे आगामी दशकांत भारतीय उपखंडात अवर्षण व दुष्काळ पडेल, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. दक्षिण भारताला त्याचा मोठा फटका बसणार आहे. नानसेन पर्यावरण संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ व भारतीय हवामान खात्याचे माजी संचालक पी.व्ही. जोसेफ यांनी हे निरीक्षण नोंदवले आहे. त्यांच्या मते, तिबेटचे पठार व मध्य चीनमधील थंड पडणारा तपावरणाचा वरचा थर हा १९६१ ते १९९० या तीन दशकातील अवर्षणाचे मूळ कारण आहे. सामान्यत: १९५० पासून या तपावरणाचे (पृथ्वीपासून १२ किमी उंचीचा वातावरणाचा थर) तापमान तीव्र गतीने घसरत असल्याने आगामी दशकांत देशात मोठ्या प्रमाणात दुष्काळाची शक्यता आहे.

पुढे वाचा, अल निनोचा विपरीत परिणाम, पर्जन्यमान घटले....