आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसई पुढील महिन्यात शाळांचे शुल्क निश्चित करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) पुढील महिन्यात देशभरात सर्वात जास्त शुल्क कोणत्या शाळेचे असू शकते आणि किती असावे? याचा आढावा शाळेद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधांनुसार ठरवणार आहे. यासाठी मंडळाने विद्यालय परिनियम आढावा समितीची स्थापना केली आहे. मंडळाचे अध्यक्ष आर. के. चतुर्वेदी यांनी ही माहिती दिली.
सीबीएसई देशभरातील शाळांना एक निर्देश जारी करत आहे. त्यात शाळांना विचारणा केली की, ते किती शुल्क घेतात आणि त्या बदल्यात विद्यार्थ्यांना कोणकोणत्या सुविधा देत आहेत? शाळांनी ही माहिती आपल्या वेबसाइटवर कोणत्याही परिस्थितीत ३१ ऑक्टोबरपर्यंत अपलोड करून सीबीएसईला पाठवणे आवश्यक आहे. यामध्ये शाळा विद्यार्थ्यांकडून किती शुल्क घेतात तसेच शाळेचा परिसर किती आहे, सीबीएसईकडून अॅफिलिएशन कधी मिळाले, अशी विचारणा शाळांकडे केली जाईल. मंडळाचे जनसंपर्क अधिकारी रमा शर्मा म्हणाल्या, अफिलिएशन बायलॉजच्या चॅप्टर कलम ११ च्या पॉइंटमध्ये बदलावरून माहिती मागितली जात आहे.
विद्यार्थ्यांच्यासुविधांवर शुल्क ठरणार : शाळेतवर्ग कसे आहेत? स्मार्ट क्लासरूम आहे किंवा नाही. वाचनाची सुविधा फिजिकल आहे की व्हर्च्युअल मोडही उपलब्ध आहे. वर्गाशिवाय प्रयोगशाळा, जीवशास्त्र भौतिकशास्त्राची प्रयोगशाळा कोणत्या स्तरावर आहे? शाळेत क्रीडा सुविधा आहेत काय? जलतरण तलाव आहे काय? कँटीन आहे की नाही? मेडिकल आणि आरोग्यासाठी कोणत्या सुविधा आहेत? याशिवाय विद्यार्थी आणि शिक्षिकांच्या सुरक्षेसाठी शाळेने काय व्यवस्था केली? शाळेत फायर अलार्म आहे की नाही? अशी विचारणा केली आहे.

वाहतूक सुविधा
स्कूलबस वाहतुकीसाठी विद्यार्थ्यांना िकती पैसे आकारले जातात? शाळेकडे स्वत:च्या किती बस आणि गाड्या आहेत. मुलांशिवाय शाळा अध्यक्ष, प्राचार्य, उपप्राचार्य यांच्याकडे स्वत:च्या किती खासगी कार आहेत? महिला शिक्षक स्टाफसाठी वाहतुकीची कोणती व्यवस्था आहे?
बातम्या आणखी आहेत...