आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांशी चर्चा केल्यानंतरच सम-विषमचा पुढील टप्पा : आप सरकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सम-विषम सूत्राच्या पहिल्या दोन टप्प्यांच्या अनुभवाबाबत दिल्ली सरकार नागरिकांशी चर्चा करणार असून त्यानंतरच पुढील टप्प्याची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती दिल्लीचे सार्वजनिक बांधकाममंत्री सत्येंद्र जैन यांनी सोमवारी दिली.

जैन म्हणाले, प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने अनेक पावले उचलली आहेत. त्यात बससाठी विशेष लेन तयार करणे आणि रस्त्यांचे व्हॅक्युम क्लीनिंग करणे यांचा समावेश आहे. बसच्या लेनचे उल्लंघन करणाऱ्यांना २ हजार रुपये दंड आकारण्याचा प्रस्ताव उपराज्यपाल नजीब जंग यांना पाठवण्यात आला आहे. त्यांनी त्यावर काही आक्षेप घेतले आहेत. त्या आक्षेपांचे निराकरण करण्यात येईल. सम-विषम सूत्राच्या अंमलबजावणीच्या कालावधीत प्रदूषण वाढल्याचा दावा करणाऱ्यांवर जैन यांनी तीव्र टीका केली. ते म्हणाले की, या काळात डिझेल व पेट्रोलचा वापर ३० टक्क्यांनी घटला आहे. मग प्रदूषण कसे वाढले? ही योजना अपयशी ठरली हे दाखवण्यासाठीच असे म्हटले जात आहे. हे चुकीचे आहे. आमचे सरकार नवीन आहे. आमची ही सुरुवात आहे. त्यामुळे काही चुका झाल्या असतील तर त्यांची जबाबदारी घेण्याची आमची तयारी आहे. अनेक मोठे लोक तशी जबाबदारी घेत नाहीत. मागील अनुभवांपासून धडा घेऊन पुढे वाटचाल करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, प्रदूषणाचा मुद्दा केंद्रस्थानी आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, असा दावा जैन यांनी केला.
दिल्ली सरकारच्या अधिकार क्षेत्रात १ हजार २६० किमी लांबीचे रस्ते येतात. ५० टक्के प्रदूषण धुळीमुळे होते, तर उर्वरित प्रदूषण वाहनांमुळे होते. धुळीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी या रस्त्यांची स्वच्छता व्हॅक्युम क्लीनर्सद्वारे करण्यात येत आहे. मात्र, या प्रकल्पाची पूर्ण अंमलबजावणी होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागेल, असे सांगून जैन म्हणाले की, धुळीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी या रस्त्यांच्या बाजूला असलेल्या मातीवर गवताचे आच्छादन करण्याची सार्वजनिक बांधकाम खात्याची योजना आहे.
बातम्या आणखी आहेत...