आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीन महिन्यांत नोकर्‍याच नोकर्‍या ; मायहेअरिंगक्लब डॉट कॉमचा सर्वेक्षण अहवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - येत्या तीन महिन्यांत भरपूर नोकर्‍या उपलब्ध होतील, असा अंदाज कंपन्यांनी व्यक्त केला आहे. मायहेअरिंगक्लब डॉट कॉमने केलेल्या सर्वेक्षणात रोजगाराच्या संधीबाबत आशादायक चित्र निर्माण झाले आहे. सर्वेक्षणात 4,431 कंपनी मालकांनी सहभाग घेतला होता. त्यातील 67 टक्के मालकांनी येत्या तिमाहीत आपल्या कंपनीत नोकर्‍या उपलब्ध होणार असल्याचे म्हटले आहे.
या तिमाहीत रोजगाराची संधी एका पॉइंटने वाढली. मात्र, 2012-13 च्या पहिल्या तिमाहीत ही वृद्धी 12 पॉइंटने झाल्याचे सर्वेक्षणात आढळले. 2013 च्या पहिल्या तिमाहीपेक्षा नोकर भरतीची स्थिती बरी आहे, असे मायहेअरिंगक्लब डॉट कॉमचे सीईओ राजेशकुमार यांनी सांगितले. एफएमसीजी आणि रिटेल क्षेत्रात रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम विभागानुसार दक्षिणेत येत्या तीन महिन्यांत 28 टक्के रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 5 टक्क्यांनी अधिक आहे. बँकिंग आणि वित्त सेवा 33 टक्के, दूरसंचार 31 टक्के,
हॉस्पिटॅलिटी 30 टक्के, पायाभूत सुविधा क्षेत्रात 30 टक्के रोजगार वाढतील. रिअल इस्टेट क्षेत्रात 29 टक्के, आॅटोमोबाइल्स व मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये 22 टक्के नोकर्‍या उपलब्ध होतील, असा अंदाज आहे.

रिटेल, आयटी क्षेत्रात चांगली संधी
सर्वेक्षणात सहभाग कंपन्यांच्या नऊपैकी सात विभागात रोजगाराचे सकारात्मक वातावरण आहे. 2013-14 वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एफएमसीजी विभागात 38 टक्के रोजगार उपलब्ध होईल. 2013 च्या पहिल्या तिमाहीपेक्षा हे प्रमाण 21 टक्क्यांनी अधिक आहे. यानंतर रिटेल, आयटी आणि आयटीशी संबंधित उद्योगामध्ये 36 ते 34 टक्के रोजगार उपलब्ध होतील, अशी आशा आहे.