आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Next Year Union Public Service Commision Give 3 Months For Main Exam

पुढील वर्षी ‘केंद्रीय लोकसेवा आयोगा’च्या मुख्‍य परीक्षेच्या तयारीसाठी मिळणार 3 महिने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) मुख्य परीक्षेसाठी पुढील वर्षी उमेदवारांना फक्त तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार पूर्वपरीक्षा पुढील वर्षी 24 ऑगस्टला तर मुख्य परीक्षा तीन महिन्यांनी 14 डिसेंबरला होत आहे.

17 मे 2014 रोजी परीक्षेची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम तारीख 1 जून असेल. आजवर पूर्वपरीक्षा मे महिन्यात घेतली जात होती. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी सात महिन्यांचा कालावधी मिळायचा. घोकंपट्टीपेक्षा नैसर्गिक गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.