आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NGP Used Photos Of Goddesses To Highlight Issue Of Crime Against Women

लक्ष्‍मी, दुर्गा आणि सरस्‍वती देवींना दाखविले घरगुती हिंसाचार पीडित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्‍ये देवतांना अतिशय मानाचे स्‍थान आहे. मात्र, एका जाहीरात कंपनीने जाहीराततीत काही देवींच्‍या छायाचित्रांचा वापर केल्‍यावरुन वाद निर्माण झाला आहे. या देवींना घरगुती हिंसेचा बळी पडल्‍याचे दाखविण्‍यात आले आहे. भारतात महिलांना देवीचा दर्जा दिला जातो. परंतु, त्‍यांच्‍यावर अत्‍याचाराचे सर्वाधिक प्रकरणे घडतात, असे या कंपनीचे म्‍हणणे आहे.

या जाहीरात कंपनीने देवी लक्ष्‍मी, दुर्गा आणि सरस्‍वतींचे काही छायाचित्रे प्रकाशित केली. त्‍यात त्‍यांना मारहाण झाल्‍याचे दाखविण्‍यात आले आहे. कंपनीने महिलांच्‍या सन्‍मानाचा मुद्दा घेऊन देवींचे छायाचित्र वापरले आहेत. या मुद्यावरुन एका वेबसाईटवर चर्चा सुरु करण्‍यात आली असून भारतात महिलांचे शोषण आणि अत्‍याचाराचा मुद्दा उपस्थित करण्‍यात आला आहे. या छायाचित्रातून कंपनीने एक संदेश देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. भारतात महिला सुरक्षित नाही. त्‍यांना घरगुती हिंसा, अत्‍याचार आणि बलात्‍कारासारख्‍या प्रकारांना तोंड द्यावे लागते, असे जाहीरातीतून सांगण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात आला आहे.

या फोटोंसाबत एक संदेश लिहीण्‍यात आला आहे. 'असा दिवस पाहण्‍याची वेळ येऊ नये, अशी प्रार्थना करा. आज भारतात 68 टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त महिला घरगुती हिंसेच्‍या बळी ठरत आहेत. अशीच स्थिती राहिल्‍यास देशात एकही महिला सुरक्षित राहणार नाही. आपण ज्‍यांची पूजा करतो, त्‍यादेखील नाही', असा हा संदेश आहे.

गेल्‍या वर्षी दिल्‍लीत डिसेंबरमध्‍ये एका तरुणीवर धावत्‍या बसमध्‍ये सामुहिक बलात्‍काराचा खळबळजनक प्रकार घडला होता. त्‍यावेळी देशभरातून निषेध व्‍यक्त करण्‍यात आला होता. देशभरात निदर्शने करण्‍यात आली होती. 'सेव्‍ह द चिल्‍ड्रेन इंडिया' या संस्‍थेने ही छायाचित्रे प्रकाशित केली आहेत. ही संस्‍था भारतात महिला आणि लहान मुलांवर होणा-या अत्‍याचारांकडे लक्ष वेधण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. अल्‍पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्‍याचे प्रकार वेगाने वाढत असल्‍याचे या संस्‍थेचे म्‍हणणे आहे.