आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NGT Bans The Sale And Use Of Glass Coated Thread In The Entire Country Including Chinese Manjha

धाेकादायक मांजाच्या वापरावर देशभर बंदी, NTG चा निर्णय, काच कोटेड धागा आहे जिवघेणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली: धारदारपणामुळे माणसांबरोबरच प्राणी आणि पक्ष्यांनाही धोका असल्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) पतंग उडवण्यासाठी मांजाच्या वापरावर देशव्यापी हंगामी बंदी घातली आहे. काच आणि धातूच्या पावडरीचे कोटिंग असलेला मांजा पर्यावरणासाठी घातक असल्याचे सांगत एनजीटीचे अध्यक्ष स्वतंत्र कुमार यांच्या न्यायपीठाने ही बंदी घातली. ही बंदी काचेचे कोटिंग असलेल्या नायलॉन, चिनी आणि सुती मांजावरही असेल.
तीन वर्षाच्या मुलीचा झाला होता मृत्यु...
- 15 ऑगस्टला दिल्लीत पतंग उडवण्याची परंपरा आहे. परंतु या दरम्यान चीनी मांजामुळे अनेक घटना घडतात.
- ऑगस्टमध्ये चीनी मांजामुळे दोन बाईकस्वार युवकांचा मृत्यु झाला होता.
- याच मांजामुळे कारच्या खिडकीतून बाहेर डोकावणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुकलीचा गळा कापाला गेला होता. त्या नंतर तिचा मृत्यु झाला होता.
- या घटणांमुळे दिल्ली सरकारनी 16 ऑगस्टला मांजाच्या वापरावर बंदीसाठी ड्राफ्ट नोटिफिकेशन काठले.

का खतरनाक आहे चीनी मांजे?
- चीनी मांजा नायलॉन पासुन बनतो. यात काच आणि लोखंडाच्या कणांच्या कोटींगचा वापर करण्यात येतो.
- हा धागा स्ट्रेचेबल असतो. त्यामुळे तो लवकर तुटत नाही.
पुढील स्लाईडवर वाचा... चीनी मांज्यामुळे अशा झाल्या दुखापती....
बातम्या आणखी आहेत...