नवी दिल्ली- तुमच्याकडे जुनी कार आहे आणि तीही 15 वर्षे जुनी तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने (एनजीटी) जुन्या गाड्या दिल्लीतून हद्दपार करण्याचे आदेश आहेत. एनजीटीच्या आदेशानुसार दिल्लीतून 10 लाखांहून अधिक पेट्रोल- डिझेल गाड्या हद्दपार होणार आहेत. दिल्लीत वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबत दिल्लीतील पार्किंगशी संबंधित समस्याही सुटणार आहे.
एनजीटीचे चेअरमन स्वतंत्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली न्यायाधिश डी.के.अग्रवाल आणि न्यायाधिश ए.आर. यूसूफ यांच्या खंडपीठाने जुन्या गाड्यांवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. दिल्लीत वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर वर्धमान कौशिक यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश अग्रवाल आणि न्यायाधीश यूसूफ यांच्या खंडपीठाने 14 महत्त्वपूर्ण निर्णय दिले. त्यात 15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या कार दिल्ली हद्दपार करण्याच्या निर्णयाचा समावेश आहे.
हे आहेत एनजीटीचे आदेश...
एनजीटीने
आपल्या निर्णयात म्हटले आहे की, 15 वर्षे आणि त्यापेक्षा जुन्या कार जर दिल्लीतील रस्त्यावर धावताना आढळल्यास त्या मोटर व्हीकल एक्टनुसार कार सीझ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक स्थळी जुन्या कार पार्क केल्या असतील तर त्यांनाही जप्त करण्याचे अधिकार संबंधित विभागाला देण्यात आले आहे. एनजीटीने आरटीओ विभागाला 15 वर्षांहून जुन्या गाड्यांचे नोंदणी नुतणीकरण करण्यास आणि फिटनेस सर्टिफिकेट न देण्यास सांगितले आहे.
एनजीटीच्या या निर्णयामुळे नव्या कारची मागणी वाढण्याची शक्यता आहे. ऑटो
मोबाइल क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येईल, असे जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.