आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NHAI To Share The Details Of The Plans To Upgrade The Existing Highways

युद्धजन्य स्थितीत पाकलगतच्या 8 हायवेंना रनवे बनविणार एअरफोर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - युद्धस्थिती निर्माण झाली तर इंडियन एअरफोर्सने (एआयएफ) देशांतर्गत महामार्गांचा उपयोग रनवे सारखा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एअरफोर्सचे म्हणणे आहे की युद्ध किंवा इतर काही आपातकालिन स्थिती निर्माण झाली तर हायवे लँडिंग करण्यासाठी सज्ज असले पाहिजे. त्यासाठी एअरफोर्सने नॅशनल हायवे ऑथरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) सोबत चर्चा सुरु केली आहे. एअरफोर्सने एनएचएआयकडे हायवे तयार करण्यासंबंधीचे सविस्तर माहिती मागवली आहे. ही बातचित यशस्वी झाली तर यापुढे एनएचएआय असे हायवे तयार करेल ज्यांचा रनवेसारखाही उपयोग होऊ शकेल. सुरुवातीला पाकिस्तान सीमेलगतच्या राज्यांमध्ये असे आठ हायवे तयार केले जातील ज्यांचा रनवेसाठी उपयोग होऊ शकेल.
रोड रनवेची टेस्टिंग केव्हा झाली
>> 21 मे रोजी साधारण सकाळी साडेसहा वाजता 'मिराज- 2000' हे फायटर प्लेन यमुना एक्स्प्रेस वेवर उतरवण्यात आले होते.
>> त्यानंतर साधारण 8.15 वाजता वायूदलाच्या एका हेलिकॉप्टरनेही एक्स्प्रेस वेवर लँडिंग केले. फायटर प्लेनने माइल स्टोन 118 जवळ लँडिंग केले होते.
>> या लँडिंगसाठी ग्रेटर नोएडा आणि आग्र्याला जोडणाऱ्या यमुना एक्स्प्रेस वेला मध्यरात्री तीनपासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आले होते.
कुठे होऊ शकतात हायवेचे रनवे
>> इंग्रजी दैनिक टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानूसार, एअरफोर्स आणि एनएचएआय यांच्यातील बातचितनुसार सर्वात पहिले राजस्थान, पंजाब आणि गुजरात या राज्यातील हायवेंना रनवे सारखे बनविण्याचा प्रस्ताव आहे.
>> त्याचे मुख्य कारण म्हणजे, ही राज्ये पाकिस्तान सीमेलगत आहेत.
>> राजस्थान आणि पंजाबमधील आठ हायवेंची यासाठी निवड झाली आहे.

भारताला रोड रनवेची गरज का पडली
बीबीसीच्या 1971 च्या एका रिपोर्टनुसार, बांगलादेश मुक्तीसंग्रामादरम्यान पाकिस्तान एअरफोर्सचे काही विमान आग्र्यापर्यंत आले होते. मात्र, ते बॉम्बवर्षाव करण्यात अपयशी ठरले. इंडियन एअरफोर्सने त्यांना पिटाळून लावले होते. मात्र तेव्हापासूनच आग्रा आणि ग्वाल्हेर एअरबेसपासून जवळच विमान उतरवण्यासाठी आणखी एक ऑप्शन शोधला जात होता.
का आहे रोड रनवे टेस्ट
>> संरक्षण तज्ञ एअर मार्शल डेंजिल किलोर यांचे म्हणणे आहे, की शत्रुच्या हल्ल्यावेळी रोडला देखील रनवे बनवावे लागेल. कोणत्या रस्त्यांवर विमान उतरवता येतील, हे ठरविण्याची टेस्ट म्हणजे रोड रनवे टेस्ट.
>> दुसऱ्या देशांमध्ये असे प्रयोग होत आले आहेत, मात्र भारतात हा पहिलाच प्रयोग होता, जेव्हा यमुना एक्स्प्रेस-वेवर फायटर प्लेनचे यशस्वी लँडिंग करण्यात आले.
>> त्यांचे म्हणणे आहे, की एअरफोर्स अजूनही देशातील विविध भागांमध्ये अशा हायवेंचा शोध घेईल, जिथे लँडिंग करणे शक्य होईल.
>> त्यामुळेच एअरफोर्स आपातकालिन स्थितीत रस्त्यांवर लँडिंग करण्याच्या क्षमतांची चाचणी घेत आहे.

रोड रनवे तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या
एअरफोर्स एअरबेसशिवाय इतर काही ठिकाणी फायटर प्लेन उतरवण्याची तयारी करत आहे. त्यात राष्ट्रीय महामार्ग हा त्यांना सर्वात सुयोग्य पर्याय वाटत आहे. तर, रोड रनवेसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात हे जाणून घेऊ या -
1 - रोड रनवेसाठी रस्ता एकदम समांतर असला पाहिजे. रस्त्या खालील जमीन ढासळणार नाही, अशी असली पाहिजे. त्यावर उतार नसला पाहिजे. आणि रस्त्याची जाडी इतर भागापेक्षा जास्त असली पाहिजे.
2 - रस्त्याच्या दुतर्फा वीजेचे खांब, हायमास्ट आणि मोबाइल टॉवर नसले पाहिजे.
3 - रस्त्याच्या दुतर्फा एवढी जागा असली पाहिजे, की फायटर प्लेनच्या लँडिंगवेळी त्याला गाइड करण्यासाठी पोर्टेबल लायटिंग सिस्टिम लावता आली पाहिजे.
4 - रस्त्यावरील डिव्हायडर तत्काळ काढता येण्यासारखे असले पाहिजे.
पुढील स्लाइडवर पाहा, यमुना एक्स्प्रेस-वेवर फायटर प्लेनचे लँडिंग