आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NIA Confused By Variations In Statement By Salvinder Singh

पठाणकोट : एनआयएकडून सलविंदर सिंग यांची चौकशी, परस्परविरोधी विधानामुळे संभ्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंजाब पोलिसांतील वरिष्ठ अधिकारी सलविंदर सिंग यांची पठाणकोट हल्ल्यासंदर्भात राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने(एनआयए) सोमवारी चौकशी केली. विविध चौकशांमध्ये सलविंदर सिंग यांनी परस्परविरोधी विधाने केली आहेत.

१-२ जानेवारीच्या मध्यरात्री दहशतवाद्यांनी पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर प्रवेश केल्यानंतर एनआयएने चौकशी सुरू केली. सलविंदर पोलिस अधीक्षक समकक्ष ७५ व्या सशस्त्र पोलिस तुकडीचे सहायक कमांडंट आहेत. दहशतवाद्यांनी त्यांच्या अपहरण केल्यानंतरच्या घटनाक्रमात सलविंदर यांच्याकडून परस्परविरोधी वक्तव्ये केल्याचे सूत्रांनी सांगितले. एनआयएने सिंग यांचा स्वयंपाकी मदन गोपाल यालाही समन्स पाठवले आहे. आवश्यकता वाटल्यास दोघांना समोरासमोर बसविले जाईल.

सिंग, गाेपाल तसेच गोपालचा मित्र राजेश वर्मा यांनी हल्ल्याच्या दिवशी भेट दिलेल्या धार्मिक स्थळाच्या रखवालदाराचा जबाब नोंदवण्यात आला आहे. गोपाल अाणि वर्मा यांनी ३१ डिसेंबर रोजी सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस भेट दिली. एकाच दिवशी दोनदा येण्यामागचे त्यांचे कारण समजू शकले नाही, असे त्याने सांगितले. एनआयएने त्याचे जबाब नोंदवले आहेत. मात्र त्यात विसंगती आढळल्याने त्याला १३ रोजी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.