आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NIA Contact Interpol For Issue Red Corner Notice To Masood

मसूदविरुद्ध रेड कॉर्नर नोटिसीसाठी एनआयएचा इंटरपोलशी संपर्क

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्याच्या कटातील सहभागाबद्दल जैश-ए-मोहंमदचा म्हाेरक्या मौलाना मसूद अझहर व अन्य तिघांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेने(एनआयए) इंटरपोलकडे संपर्क साधला आहे. त्याआधी एनआयएने मसूदविरुद्ध अटक वॉरंट प्राप्त केले आहे.

सरकारी सूत्रांच्या मते, मोहालीतील एनआयएच्या विशेष न्यायालयाने जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट व कागदपत्रे सीबीआयकडे देण्यात आली आहेत. देशात इंटरपोलचे प्रतिनिधित्व सीबीआय करते. एनआयएने अझहर, त्याचा भाऊ अब्दुल रऊफ, काशीफ जान व शाहिद लतीफ व पंजाबमधील बामियाल क्षेत्रात ३० डिसेंबर रोजी पहाटे घुसखोरी करणाऱ्या जैश-ए-मोहंमदच्या दोन हस्तकांचा समावेश आहे. जैशच्या अतिरेक्यांनी टॅक्सीचे अपहरण करून चालक इकगर सिंगची हत्या केली. यानंतर पंजाब पोलिसातील अधिकारी सलविंदर सिंग, त्यांचा मित्र राजेश वर्मा व स्वयंपाकी मदन गोपाल प्रवास करत असलेली गाडी ३१ डिसेंबर रोजी अतिरेक्यांनी ताब्यात घेतली. रसीर हुसेन(पंजाब प्रांत), अबू बकर(गुजरनवाला), उमर फारूक अब्दुल कय्युम(दोघेही सिंधमधील) या अतिरेक्यांनी २ जानेवारी रोजी पहाटे हवाई दलाच्या तळावर पोहोचून आत्मघाती हल्ला घडवला. दरम्यान, मसूद अजहर विरोधात इंटरपोलचे एक रेड कॉर्नर नोटीस आधीच प्रलंबित आहे. संसद व जम्मू काश्मीर विधानसभेवरील हल्लाप्रकरणी ते जारी केले गेले होते.