आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनआयएचे तंजील अहमद यांच्या जखमी पत्नीचा दिल्लीत मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / बिजनोर - राष्ट्रीय तपास संस्थेचे अधिकारी तंजील अहमद यांच्या पत्नी फरझाना खातून यांचा दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.फरझाना याही या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना एम्समध्ये दाखल केले होते.

तंजील अहमद हे २ एप्रिलच्या मध्यरात्री भाचीच्या स्वागत समारंभानंतर साहसपूर येथील घरी परतत होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात तंजील यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली होती. त्यांची दोन मुले मात्र हल्ल्यातून बचावली आहेत.

दरम्यान, बिजनोरचे सहायक पोलिस अधीक्षक धरमवीर सिंह यांनी सांगितले की, तंजिल हत्या प्रकरणी रिझवान आणि तंझीम या दोघांना बुधवारी सकाळी अटक करण्यात आली.
रेहान आणि झैनुल यांना मंगळवारी अटक झाली होती. रिझवान आणि तंझीम यांचाही कटात सहभाग असल्याची माहिती या दोघांनी दिली. त्यावरून या दोघांना अटक झाली आहे. कटाचा सूत्रधार मुनीर हा अजूनही फरारच आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.

आणखी दोघांना अटक
तंजील अहमद यांच्या हत्या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी बुधवारी आणखी दोघांना अटक केली. त्यामुळे अटक झालेल्यांची संख्या आता चार झाली आहे. हत्या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार मात्र अजूनही फरारच आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा असा रचला होता हत्‍येचा कट.., लग्‍नाच्‍या व्‍हिडीओतूनही मिळाली काही फोटोज.., 50 हजार कॉलची पडताळणी.., कारसमोर हल्‍लेखोरांची दुचाकी आडवी झाली.., काय म्‍हणाली मुले..
बातम्या आणखी आहेत...