आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NIA Said Two Out Of Six Terrorists Of Pathankot Amay Be Insiders

पठाणकोट हल्ला: तपास यंत्रणेला शंका, 6 पैकी 2 दहशतवादी होते आतील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पठाणकोट एअरबेसवरील हल्ल्या संदर्भात नवा खुलासा झाला आहे. एनआयएचे म्हणणे आहे, की एअरबेसवरील दहशतवादी हल्ल्यात सहा पैकी दोन आतील असण्याची शक्यता आहे. माध्यमातील वृत्तानुसार, एनआयएच्या अधिकाऱ्यांनी त्यांची ओळख उघड करण्यास नकार दिला आहे.
- एनआयएचा दावा आहे, की हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे सेलफोन सापडले. त्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली.
- फोन कॉल्स आणि एका कर्मचाऱ्याची चौकशी केली जात आहे. त्याचा अहवाल पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे.
- या अहवालात दहशतवाद्यांमध्ये आतील दोघांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
- सरकारने 2-3 जानेवारीला एअरबेसवर झालेल्या हल्ल्यात सहा दहशतवादी असल्याचे सांगितले होते. त्यातील चार बाहेरचे असल्याचे पुरावे मिळाले आहेत. ते चौघे पंजाबला लागून असलेल्या पाकिस्तान बॉर्डरकडून आले होते.
कसे मिळाले पुरावे
एनआयएच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हल्ला झाला तिथून चार एके-47 रायफल्स जप्त करण्यात आल्या. या चारही रायफल्स जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्या होत्या.
- इंटरपोलने ज्यांच्या विरोधात ब्लॅक कॉर्नर नोटीस काढली होती तीही चार दहशतवाद्यांचीच होती.

कसा चालू आहे तपास
- एनआयएचे अधिकारी त्या दोघांचा शोध घेण्यासाठी हल्ला झाला त्यावेळी एअरबेसमध्ये तैनात असलेल्या सर्व जवानांसह, सिव्हिलचे किती लोक आतमध्ये होते याची तापसणी करत आहे.
- हल्ल्या दरम्यान एअरबेसमध्ये 3500 लोक होते. यात कर्मचाऱ्यांचे कुटुंब देखिल होते.
- एनआयएचे अधिकारी शरदकुमार म्हणाले, 'फक्त चार शस्त्र सापडले होते. आता फॉरेन्सिक रिपोर्टची आम्ही वाट पाहात आहोत.'

कुठून मिळाले पुरावे
- एअरबेसमधील एका बिल्डिंगमध्ये दोन संशयित दहशवताद्यांना मारण्यात आले होते. त्याच बिल्डिंगच्या ढिगाऱ्यातून एनआयएने पुरावे गोळा केले आहेत.
- तपास यंत्रणांनी आधीच सांगितले आहे, की चार दहशतवादी 1 जानेवरी रोजी पाहाटे एअरबेसची 11 फूट भिंत पारकरुन आत घुसले होते.
- एअरबेसमध्ये दाखल झाल्यानंतर एका दहशतवाद्याने पाकिस्तानात आईला फोन केला होता.
- गुरदासपूरचे माजी एसपी सलविंदरसिंग यांनीही अलर्ट पाठवला होता.
- सलविंदर यांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते, नंतर त्यांना सोडून देण्यात आले.
- सलविंदर देखिल एक संशयित आहे. त्यांची चौकशी सुरु आहे.
- सलविंदरची लाय डिटेक्टर टेस्ट झाली असून आणखी टेस्ट होण्याची शक्यता आहे.
- सलविंदरसोबत त्यांचा कुक मदन गोपाल, आणि दर्गा केअर टेकर यांची देखिल चाचणी होणार आहे.
- हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सलिवंदरचा ज्वेलर्स मित्र राजेशची चौकशी होईल.