आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NIA Will Approach US Seeking Information On Pathankot Attackers

पठाणकोट: तपासात अमेरिकेची मदत घेणार भारत, सालविंदर यांची लाय डिटेक्टर टेस्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) अमेरिकेच्या तपास यंत्रणेच्या मदतीने शोध घेणार आहे, की दहशतवाद्यांकडे अमेरिकेची दुर्बिन कशी आली. पाकिस्तानी लष्कर देखिल अमेरिकेत तयार झालेल्या या दुर्बिनींचा वापरत करते.

'जैश'ने अमेरिकेच्या एअरबेसमध्ये चोरी तर केली नाही
- एनआयएला शंका आहे, की जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानातील यूएस आर्मीच्या एअरबेसवरुन ही दुर्बिन चोरली असली पाहिजे.
- पाकिस्तान आर्मी देखिल अमेरिकेत तयार झालेली अनेक उपकरणे वापरत असते. पाक आर्मीनेच जैशच्या दहशतवाद्यांना दुर्बिन दिली असण्याचीही शक्यता आहे.
- अमेरिकेच्या तपास यंत्रणेला दुर्बिनीचा सिरियल नंबर देऊन त्याबाबतची अधिक माहिती घेतली जाईल. या दुर्बिनीची चोरी झाली का ? याचीही विचारणा केली जाणार आहे. त्यांचे उत्तर होय असेल तर कुठे आणि केव्हा ? याचाही शोध घेतला जाईल.
- एनआयएने एके-47 रायफल्सचे सिरियल नंबर देखिल मिळवले आहेत. ही शस्त्रे त्यांच्या हाती कशी गेली याचा तपास केला जात आहे. क्लानिशकोव्ह कंपनीला सर्व माहिती देण्यात येत आहे.
- विशेष म्हणज, गुरदासपुर आणि दिनानगर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही अमेरिका आणि पाकिस्तान मेड वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या.
पुढील स्लाइडमध्ये, एसपी सालविंदर सिंग यांची होणार लाय डिटेक्टर टेस्ट