आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमिर म्हणाला- चुकीचा प्रचार करत आहे मुस्लिम धर्म प्रसारक झाकीर नाईक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/मुंबई - आमिर खानने वादग्रस्त मुस्लिम प्रचारक डॉ. झाकीर नाईक यांना विरोध केला आहे. गुरुवारी ईदच्या निमीत्त मीडियासोबत बोलताना आमिर म्हणाला, झाकीर धर्माचा चुकीचा प्रचार करत आहे. कोणताही धर्म दहशतवाद शिकवत नाही, तर प्रेम हाच धर्माचा प्रमुख संदेश असतो. दहशतवाद पसरवणाऱ्यांचा धर्माशी काहीही संबंध नाही.तर, रजा अकॅडमीने मुंबईत नाईकविरोधात आंदोलन केले आणि त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली.
दुसरीकडे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) नाईक यांची चौकशी सुरु केली आहे. मुंबईत नाईक यांच्या कार्यालयाभोवती सुरक्षा वाढविण्यात आली आहे. बांगलादेशातील ढाका येथे हल्ला करणारे दोन दहशतवादी झाकीर यांच्या भाषणांनी प्रभावित झाल्याचे म्हटले गेले आहे. बांगलादेश सरकारने याबाबत भारत सरकारकडून मदत मागितली आहे. नाईक यांची भाषणे ही मुस्लिम दहशतवादाला प्रोत्साहन देणारी असल्याचे आता म्हटले जाऊ लागले आहे.

विना परवानगी सुरु आहे पीस TV
> मुंबईत जन्मलेले आणि तिथेच एमबीबीएस केलेले डॉ. झाकीर नाईक यांचे भाषण भारतात पीस टीव्ही या चॅनलवर पाहाता येते. दुबईतून चालवल्या जाणाऱ्या या चॅनलकडे भारतात प्रसारणाचे लायसन्स नाही. मात्र तरीही येथील केबल ऑपरेटर हे चॅनल दाखवत आहेत.
> भारतात प्रसारणाचा हक्क नसताना एखादे चॅनल बिनबोभाट सुरु राहाते, यातून इंडियन ब्रॉडकास्ट ऑथॉरिटीमधील त्रुटी स्पष्ट दिसत आहेत. भारतासोबतच हे चॅनल बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ आणि इतर शेजीर देशांमध्येही प्रसारित होते.
> ही मोठी त्रुटी समोर आल्यानंतर इंडियन ब्रॉडकास्ट मिनिस्ट्री आता सर्व लायसन्स्ड चॅनल्सची यादी देशातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांना पाठविणार आहे. त्यानंतर विना परवानगी सुरु असलेले चॅनल बंद केले जातील.
> काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये अटक करण्यात आलेल्या पाच आयएस संशयितांनीही ते नाईक यांची भाषणे एकून प्रभावित झाल्याचे सांगितले होते.
पुढील स्लाइडमध्ये वाचा,
> कोण आहे झाकीर नाईक...
> बांगलादेशात दहशतवाद्यांनी चिरले निरपराधांचे गळे
बातम्या आणखी आहेत...