आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nido Tania Murder Case Speedily Investigated Sushilkumar Shinde

निडो तानियाच्या हत्या प्रकरणाचा तपास वेगात करणार - सुशीलकुमार शिंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अरुणाचल प्रदेशचा विद्यार्थी निडो तानियाच्या हत्या प्रकरणाचा तपास वेगात केला जाईल, तसेच यातील गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिले आहे.
अल्पसंख्याक खात्याचे राज्यमंत्री निनोंग इरिंग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना हे आश्वासन देण्यात आले. निडो तानिया येथे बीए प्रथम वर्षात शिकत होता. लाजपतनगर येथील एका जमावाच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. गृह मंत्रालयाने या प्रकरणाची न्यायदंडाधिका-यामार्फत चौकशी करण्याची तयारी दर्शवली आहे. ईशान्यकडील विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी प्रशासकीय समिती स्थापन करणार आहे.
निडो प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरलेल्या दिल्ली पोलिसांविरुद्ध सीबीआय चौकशी करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली आहे. इरिंग यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या गटाने सोमवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन जलदगतीने तपास होण्यास मदत करण्याची मागणी केली. यानंतर सायंकाळी राहुल जंतर
मंतरवरील धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.