आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nigerian Held With Heroin Valued At Rs.70 Lakh News In Divya Marathi

अमली पदार्थांचा तस्कर गजाआड;70 लाखांचे हेरॉइन जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अमेरिकेत हेरॉइनची तस्करी करणार्‍या 23 वर्षीय नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली. आरोपीने महिलांच्या सँडलमध्ये फट तयार करून लपवलेले हेरॉइन एअर कुरियरमार्फत नेण्यात येत होते. ओडेओमनन केनथ ओझिओमा असे आरोपीचे नाव आहे.

70 लाख रुपये किमतीचे 330 ग्रॅम हेरॉइन महिलांच्या सँडलमध्ये लपवून ठेवले होते. आरोपीकडून ते जप्त करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त रवींद्र यादव यांनी बुधवारी दिली. अमली पदार्थांची तस्करी आता एअर कुरियरमार्फत केली जात आहे. अमली पदार्थविरोधी शाखेने अलीकडेच गोल्फ किटमधून 400 ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले.