आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nihal Chand Meghwal Meets With Home Minister Rajnath Singh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेघवाल गृहमंत्र्यांच्या भेटीला, बलात्काराच्या आरोपाची सत्यता तपासण्याची जबाबदारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बलात्काराच्या आरोप अडकलेले केंद्रीय रसायन आणि खते राज्यमंत्री निहालचंद मेघवाल यांनी आज (शुक्रवार) गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. सुत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत गृहमंत्र्यांनी मेघवाल यांना कोर्टात निरपराधी असल्याचे सिद्ध करा असे सांगितले आहे. तसेच या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत पक्ष तुमच्या सोबत असल्याचाही विश्वास दिला आहे. मेघवाल यांच्यावरील बलात्काराच्या आरोपा बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गंभीर आहेत. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाने एका मंत्र्याला मेघवाल यांच्यावरील आरोपांची सत्यता पडताळण्याची जबाबदारी सोपवली आहे. या मंत्री महोदयांच्या अहवालानंतरच मोदी मेघवाल यांच्यासंबंधीचा निर्णय घेणार आहेत.
काँग्रेस राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
राज्यमंत्री निहालचंद मेघवाल यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर काँग्रेसला मोदी सरकारवर टीका करण्याची ऐतीच संधी मिळाली आहे. गुरुवारी काँग्रेस महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजप मुख्यालया बाहेर जोरदार निदर्शने केली आणि मेघवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे मेघवाल यांच्यावर मोठा दबाव आला आहे. राजस्थान भाजपने मेघवाल यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी हा काँग्रेसचाच डाव असल्याचे म्हटले आहे.
काय आहे प्रकरण वाचा, पुढील स्लाइडमध्ये