आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामूहिक बलात्कारातील नऊ आरोपी निर्दोष, आरोपींविरोधात पुरावा नसल्याचा न्यायालयाचा निर्वाळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील ९ आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष न्यायमूर्ती शैल जैन यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता करताना त्यांच्याविरोधात सबळ पुरावा नसल्याचे सांगितले. २४ वर्षीय विद्यार्थिनीवर ५ जानेवारी २००९ रोजी बलात्कार झाला होता.  
 
ही घटना घडली तेव्हा ती आपल्या मित्राच्या कारने नोएडातील एका मॉलमधून परतत होती. रस्त्यात ११ तरुणांनी बॅट्स दाखवून कार रोखली. कार थांबताच काही तरुण कारमध्ये शिरले. त्यांनी गाडी एका निर्जनस्थळी नेली. तेथे या ११ आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. यातील एक अारोपी अल्पवयीन होता.

पीडित व मित्रास धमक्या 
पीडित विद्यार्थिनीस आणि तिच्या मित्रास या आरोपींनी प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव टाकला होता. तसेच तिला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. धमक्यांमुळे ती लंडनला निघून गेली. तिच्या मित्राने आपल्या जिवाला धोका असल्याचे  सांगत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यानंतर हा खटला नोएडा न्यायालयातून दिल्लीच्या तीसहजारी न्यायालयात पाठवण्यात आला.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...