नवी दिल्ली- मुंबई सेंट्रलनंतर देशातील आणखी नऊ रेल्वे स्टेशन्सवर Wi-Fi फॅसिलिटी मिळण्यास सुरवात झाली आहे. याचा सुमारे 15 लाख प्रवाशांना फायदा होणार आहे. या प्रोजेक्टसाठी
गुगलने भारतीय रेल्वेची टेलिकॉम कंपनी रेलटेलसोबत करार केला आहे. नऊ स्टेशन्सपैकी भुवनेश्वरला या फॅसिलिटीचे उद्घाटन रविवारी केले जाणार आहे. या कार्यक्रमाला रेल्वेमंत्री सुरेश प्रभु उपस्थित राहतील.
या नवीन स्टेशन्सवर मिळणार आहे Wi-Fi
- या वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून मुंबई सेंट्रलवर Wi-Fi कनेक्टिव्हिटी मिळत आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा येथे सुरु करण्यात आली होती.
- पुणे, भोपाळ, रांची, रायपूर, विजयवाडा, कचेगुडा (हैदराबाद), एर्नाकुलम (कोच्ची) आणि विशाखापट्टणम् या रेल्वे स्टेशन्सवर ही सुविधा आता सुरु करण्यात आली आहे.
- गुगल इंटरनेट प्रोजेक्टचे इंडिया हेड गुलजार आझाद यांनी सांगितले, की सध्या केवळ मुंबई सेंट्रल स्टेशनवर आठवड्याभरात एक लाख प्रवाशांनी याचा लाभ घेतला आहे.
यावर्षी 100 आणि एकूण 400 रेल्वे स्टेशन्स होणार Wi-Fi
- नऊ रेल्वे स्टेशन्सवर Wi-Fi पुरवल्यानंतर जयपूर, उज्जैन आणि अलाहाबाद स्टेशन्सवर ही सुविधा पुरवली जाणार आहे.
- हा प्रोजेक्ट म्हणजे देशातील सर्वांत हायस्पिड इंटरनेट वायफाय नेटवर्क असेल. प्रवाशांना विश्वासार्ह स्पीड आणि सेवा देण्याचा प्रयत्न राहणार आहे.
- या वर्षाच्या अखेरपर्यंत 100 स्टेशन्स Wi-Fi केले जातील. त्यातून 10 मिलियन म्हणजेच एक कोटी प्रवाशांना फायदा होईल. त्यानंतर 400 स्टेशन्सना सुविधा पुरवली जाईल.
- डिसेंबर 2015 मध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी भारत दौऱ्याच्या वेळी याची घोषणा केली होती.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर कसे कनेक्ट करायचे इंटरनेट... 30 मिनिट फ्री वापर केल्यावर द्यावे लागणार शुल्क....