आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदभार स्वीकारताच निर्मला अॅक्शनमध्ये, माजी सैनिकांसाठी जारी केले 13 कोटी रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीतारमण यांनी गुरुवारी संरक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. - Divya Marathi
सीतारमण यांनी गुरुवारी संरक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला.
नवी दिल्ली - निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी (7सप्टेंबर) पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर लागलीच त्या कामाला लागल्या. काही वेळातच त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून माजी सैनिकांना आर्थिक सहायता निधी (आरएमईडब्ल्यूएफ) मंजूर केला. 
 
> निर्मला यांनी 8685 माजी सैनिक, विधवा आणि आश्रित सैनिकांना आर्म्ड फोर्सेस फ्लॅग डे फंडमधून 13 कोटी रुपयांपेक्षा अधिक अनुदान जारी केले. 
> संरक्षण मंत्री झाल्यानंतर आठवड्याभरात निर्मला सीतारमण बॉर्डर दौऱ्यावर जाणार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...