Home | National | Delhi | Nirmala Sitharaman Namastey Chinese Daily Chinese Soldiers

सीतारमण यांची नमस्ते डिप्लोमॅसी दोन्ही देशांच्या लोकांची मानसिकता बदलेल- चीनी मीडिया

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 10, 2017, 05:31 PM IST

नच्या सरकारी मीडियाने मंगळवारी म्हटले आहे की यामुळे दोन्ही देशांच्या लोकांच्या मानसिकतेत बदल होईल.

 • Nirmala Sitharaman Namastey Chinese Daily Chinese Soldiers
  बीजिंग/नवी दिल्ली - भारत-चीनच्या तणातणीमध्ये संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या 'नमस्ते डिप्लोमॅसी'चे चीनने स्वागत केले आहे. चीनच्या सरकारी मीडियाने मंगळवारी म्हटले आहे की यामुळे दोन्ही देशांच्या लोकांच्या मानसिकतेत बदल होईल. शनिवारी सीतारमण यांनी नाथु ला पासचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी तिथे तैनात चीनी सैनिकांची भेट घेतली. सीतारमण यांनी त्यांना 'नमस्ते' म्हटले होते, त्यासोबतच या शब्दांचा अर्थही समजावून सांगितला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
  आशा आहे की भारतीय देखील याचे स्वागत करतील
  - सीतारमण यांनी बॉर्डरवरील चीनी सैनिकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली होती. या भेटीचा उल्लेख मंगळवारच्या 'ग्लोबल टाइम्स'च्या अग्रलेखात करण्यात आला आहे. हे चीनचे अधिकृत सरकारी दैनिक आहे.
  - ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे, की आशा आहे संरक्षण मंत्र्यांनी दाखवलेल्या मैत्रीचा स्वीकार सर्व भारतीय देखील करतील. सीतारमण यांनी घेतलेला पुढाकार हा दोन्ही देशांतील लोकांमध्ये निर्माण झालेला दुरावा कमी करण्यासाठी उपयोगी ठरेल आणि त्यांच्या मानसीकतेमध्येही बदल घडून येईल.
  - सीतारमण चीनी सैनिकांसोबत बातचीत करत होत्या, त्याचा एका भारतीय जवानाने व्हिडिओ तयार केला होता. नंतर संरक्षण मंत्रालयाने हा व्हिडिओ जारी केला आहे.

 • Nirmala Sitharaman Namastey Chinese Daily Chinese Soldiers

Trending