फोटो : घरात सुरेंद्र कोलीचा फोटो घेऊन असलेल्या सुरेंद्र कोलीची आई कुंती देवी
मंगरूखाल/अल्मोड़ा/लखनऊ - निठारी कांडातील मुख्य आरोपी सुरेंद्र कोली यांच्या फाशीला सुप्रीम कोर्टाने 29 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यानंतर रविवारी त्यांची पत्नी मुलांसह सुमारे आठ वर्षांनंतर गाझियाबाद येथील तुरुंगात भेटली होती.
या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आमच्या टिमने कोलीच्या उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्याच्या मंगरूखाल गावात जाऊन त्याच्या घरी भेट दिली. मंगरुखाल गावात कोलीचे मातीचे पारंपरिक घर आहे. घराची मोठ्या प्रमाणावर दूरवस्था झाल्याचे दिसून आले. याठिकाणी सध्या फक्त कोलीच्या आई कुंती देवी या राहतात. कोलीच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबात त्याच्या आईशिवाय त्याचे तीन भाऊ आणि एक बहीण आहे. सर्वात मोठा भाऊ चंदनराम, दुसरा आंनदराम आणि तिसरा तिसरा सुरेंद्र कोली. चौथ्या भावाचा
विवाह अद्याप झालेला नाही. गावात कोलीची आई आणि पत्नी राहायच्या. पण सहा महिन्यांपूर्वी त्याची पत्नी मुलांन घेऊन दिल्लीला आली आहे.
पुढे वाचा, कोणीच राहत नाही, कोलीच्या घरी...