आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील 5 वर्षांत भारत गरिबी, भ्रष्टाचारमुक्त: नीती आयोगाचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतातील गरिबी, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीयवाद, धर्मांधता २०२२ पर्यंत संपुष्टात येईल, असा दावा नीती आयोगाने केला आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांनी गेल्या महिन्यात राज्यपालांच्या परिषदेत न्यू इंडिया@२०२२ डॉक्युमेंट सादर केले होते. त्यात याचा उल्लेख आहे. भारताने जर ८ टक्क्यांच्या दराने विकास साधला तर २०४७ पर्यंत आपण जगातील तीन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांत समाविष्ट होऊ, असे त्यांचे मत अाहे. आयोगानुसार, २०२२ पर्यंत कुपोषणमुक्त भारताचेही उद्दिष्ट साध्य हाेईल. ग्राम सडक याेजनेअंतर्गत २०१९ पर्यंत सर्व गावे ऑल वेदर रोडने जोडली जातील.
 
काय आहे सद्य:स्थिती ?
भूकबळी निर्देशांक :
इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च संस्थेच्या जागतिक भूकबळी निर्देशांकातील ११९ देशांच्या यादीत भारत १०० व्या स्थानी आहे. आशियात भारतापुढे केवळ पाकिस्तान व अफगाणिस्तान आहेत.

मानवी विकास निर्देशांक : वर्ल्ड ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या १६८ देशांच्या यादीत भारत १३१ व्या स्थानी आहे. चीन (९०) व श्रीलंकेचे (७३) रँकिंग भारतापेक्षा चांगले आहे.

गरिबी निर्देशांक : इंटरनॅशनल मल्टी डायमेन्शन पॉव्हर्टी इंडेक्सनुसार पाेषण देण्यात भारताची कामगिरी खराब अाहे, हे गरिबीमागचे एक कारण. भारताची ६० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या, सुमारे ५५% लोक गरीब.
 
कोणती उद्दिष्टे साध्य करू शकेल भारत?
 
1) टॉप 3 इकॉनॉमीमध्ये असेल भारत
- न्यू इंडिया @2022 डॉक्युमेंटसनुसार, भारताने जर 8 टक्के दराने विकास केला, तर 2047 पर्यंत तो जगातील टॉप 3 अर्थव्यवस्थांमध्ये सामील होईल.
 
2) कुपोषणमुक्त असेल भारत
- डॉक्युमेंट्सनुसार, 2022 पर्यंत कुपोषणमुक्त भारताचे लक्ष्यही साध्य होऊ शकेल. पंतप्रधान ग्राम सडक परियोजना (PMGSY) 2019 पर्यंत गावे ऑल वेदर रोडने जोडली जातील.
 
3) 20 वर्ल्ड क्लास उच्चशिक्षण संस्था असतील...
 - भारतात 2022 पर्यँत 20 अशा वर्ल्ड क्लास संस्था असतील ज्यात उच्च शिक्षण मिळू शकेल. पंतप्रधान आदर्श ग्राम योजना (PMAGY) अंतर्गत निवडलेली गावे आदर्श गावांचे उद्दिष्ट पूर्ण करतील. गरिबीची समस्याही दूर केली जाईल.
 
 पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटो....
बातम्या आणखी आहेत...