आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरी, मुंडेंना कॅबिनेट ! शिवसेनेच्या सहा मंत्रिपदाला नरेंद्र मोदींचा नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नरेंद्र मोदी आणि भाजपच्या चार वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील सात जणांच्या मंत्रिपदावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यात भाजप नेते नितीन गडकरी व गोपीनाथ मुंडे यांना कॅबिनेट, तर रावसाहेब दानवे, दिलीप गांधी, पीयूष गोयल, हंसराज अहिर व हरिश्चंद्र चव्हाण यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गडकरी, मुंडे यांचा सोमवारी शपथविधी होणार आहे. तर राज्यमंत्र्यांचा शपथविधी दुसर्‍या टप्प्यात होईल.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मोदी एकूण 45 मंत्र्यांसह शपथ घेणार आहेत. त्यांनी मंत्र्यांच्या नावाची यादी राष्ट्रपती भवनाकडे पाठवली आहे. संभाव्य यादीत 24 कॅबिनेट आणि 11 राज्य मंत्र्यांचा समावेश असेल. तर 10 मंत्र्यांकडे स्वतंत्र प्रभार असणार आहे.
कोणाला कोणते मंत्रालय
राजनाथ सिंह - गृहमंत्री
नितिन गडकरी - परिवहन मंत्री
अरुण जेटली - अर्थमंत्री
सुषमा स्वराज - परराष्ट्र मंत्री
रवीशंकर प्रसाद - कायदा आणि माहिती व प्रसारण मंत्रालय
सदानंद गौडा - रेल्वेमंत्री
जितेंद्र सिंह - अंतराळ विषयीचे मंत्री
रामविलास पासवान - ग्राहक संरक्षणमंत्री
हरसिमरत कौर - अन्न प्रक्रिया मंत्री
राधामोहन सिंह - कृषिमंत्री
स्मृती ईरानी - मनुष्यबळ विकास मंत्री
मोदी यांनी गडकरी, अमित शहा, अरुण जेटली यांच्यासोबत महाराष्ट्राविषयी चर्चा केली. त्यात वरील नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. राज्यमंत्र्यांतील दोघांना स्वतंत्र कार्यभार खाती दिली जाऊ शकतात. गडकरी यांना ट्रान्सपोर्ट खाते मिळेल. यात रेल्वे, रस्ते वाहतूक, महामार्ग, जहाज व नागरी उड्डयन हे विभाग येतील. मुंडे यांच्या कृषी खात्याअंतर्गत रासायनिक खते, अन्न प्रक्रिया, नागरी पुरवठा हे विभाग आहेत.
दरम्यान, दानवे कुटुंबीय औरंगाबादहून दिल्लीकडे निघाले आहेत. पत्नी निर्मलाताई, पुत्र संतोष, जावई आमदार हर्षवर्धन जाधव, मुकेश पांडे, नातू शिवम पांडे हे त्यात आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, उद्धव यांच्या मागणीला मोदींचा नकार