आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Gadkari Floats Idea To Try 3d Paintings As Virtual Speed Breakers

महामार्गावर 3-डी पेंटिंगने व्हर्च्युअल गतिरोधक; नितीन गडकरी यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील महामार्गांवर ३-डी पेंटिंग केलेले व्हर्च्युअल गतिरोधक लवकरच दिसू लागतील. महत्त्वाचे महामार्ग आणि अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांवर ही सुविधा पुरवण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

अनेक रस्त्यांवर अनावश्यक पद्धतीने गतिरोधके बसवण्यात आल्याचे दिसून येते. अशा गतिरोधकांची वास्तविक आवश्यकता नसते. त्यामुळेच आम्ही ३-डी पेंटिंगपासून तयार करण्यात आलेल्या व्हर्च्युअल गतिरोधकांवर प्रयाेग करत आहोत. ते यशस्वी झाल्यास देशातील निवडक महामार्ग-रस्त्यांवर अशी गतिरोधकांचा त्रास कमी होऊ शकतो. गडकरी यांनी ट्विट करून मंगळवारी ही माहिती दिली. देशात वर्षाकाठी सुमारे लाख रस्ते अपघात होतात. त्यापैकी सुमारे दीड लाख लोकांना प्राण गमावावे लागतात, तर लाख जणांवर अपंग होण्याची वेळ येते. ट्विटरवरील काही फॉलोअरने प्रतिक्रिया दिल्या. १४ वर्षांपूर्वी हे तंत्रज्ञान अमेरिका-कॅनडात अवलंबण्यात आले होते. अशा प्रकारच्या व्हर्च्युअल गतिरोधकाला भरधाव जाणारे चालक दाद देतील, असे तुम्हाला वाटते? असा सवालही एका फॉलोअरने म्हटले. सरकारची ही योजना चुकीचे असल्याचे एकाने म्हटले आहे.