आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शौचालयांची दुरवस्था कॉँग्रेसमुळेच - नितीन गडकरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचे स्वप्न पाहिले असून २०१९ पर्यंत संपूर्ण देश स्वच्छ होईल, याकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत लक्ष वेधले. तेव्हा गुजरातमध्ये अद्यापही २ कोटी ५५ लाख लोक उघड्यावर शौचास का जातात, असा प्रश्न ‘दिव्य मराठी’ने विचारला. तेव्हा गडकरी गडबडले आणि म्हणाले, ‘कॉँग्रेसनेच आजवर स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे.

२०११ मध्ये झालेल्या जनगणनेत गुजरातमध्ये २ कोटी ५५ लाख लोक उघड्यावर शौचास जातात असे अहवाल सांगतो. इतकी वर्षे मुख्यमंत्री असूनही नरेंद्र मोदी गुजरातचा हा प्रश्न सोडवू शकले नाहीत, मग तुम्ही साडेचार वर्षात उघड्यावर शौचास जाणा-या ६० कोटी लोकांचा प्रश्न कसा सोडवणार आहात, असा प्रश्न त्यांना िवचारला. या प्रश्नाने गडकरी अस्वस्थ झाले. ते म्हणाले, शौचालयांची व्यवस्था सुरुवातीपासून व्हायला पाहिजे होती. कॉँग्रेस सरकारने सातत्याने त्याकडे दुर्लक्ष केले. आम्ही सध्या आढावा घेऊन नेमकी स्थिती काय आहे ते जाणून घेऊ. आता आम्ही विकासाला सुरुवात केली आहे. आमच्या कामाला तुम्हा सगळ्यांचे सहकार्य व श्ुभेच्छा हव्यात, असे सांगत गडकरींनी गुजरातच्या शौचालय प्रश्नाला बगल दिली.