आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Gadkari News In Marathi, Gadkari Speak About Vidhansabha Election, Divya Marathi

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा लक्ष घालण्यात रस नाही - नितीन गडकरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - आगामी विधानसभा गोपीनाथ मुंडे यांच्‍या नेतृत्‍वाखाली लढणार असल्‍याचे पूर्वी भाजपने स्‍पष्‍ट केले होते. मात्र गोपीनाथ मुंडे यांच्‍या आकस्मित निधनाने महाराष्‍ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपचे नेतृत्‍व कोण करणार असा प्रश्‍न भाजपसमोर आहे.
मुंडेंनंतर महाराष्‍ट्राचे नेतृत्‍व केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी करावे अशी चर्चा होती मात्र आज (रविवार) गडकरींनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
गडकरी म्‍हणाले की, 'काही वर्षांपूर्वी मी दिल्‍लीच्‍या राजकारणात जाण्‍यास उत्‍सुक नव्‍हतो. मात्र आता दिल्‍ली सोडायला मन धजत नाही. महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात पुन्‍हा लक्ष घालण्‍यात आता रस नाही'.
मुंडेच्‍या अकाली जाण्‍याने भाजपला महाराष्‍ट्रात पोकळी नक्‍कीच भासेल. परंतु ही पोकळी कोण भरुन काढणार हा भाजपसमोर यक्ष प्रश्‍न आहे.