आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा लावणार 200 कोटी झाडे; नितीन गडकरी यांची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी देशातील 1 लाख किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूंनी 200 कोटी झाडे लावण्याची केंद्र सरकारची योजना आहे.

देशातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी 1 लाख किलोमीटर आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी 200 कोटी झाडे लावण्याची योजना तयार करण्यास मी अधिकार्‍यांना सांगितले आहे. त्यामुळे एकीकडे बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल आणि दुसरीकडे पर्यावरणाचे रक्षणही होईल, असे भूपृष्ठ वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. अशीच योजना मनरेगाअंतर्गत गाव, जिल्हा रस्ते आणि राज्य महामार्गावरही राबवता येऊ शकते. या योजनेतून 30 लाख युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे सामर्थ्य आहे, असे गडकरी यांनी नदीजोड प्रकल्पावरील परिषदेचे उद्घाटन करताना सांगितले.

प्रत्येक तरुणावर 50 झाडांची जबाबदारी
ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन एका बेरोजगार तरुणावर 50 झाडांची जबाबदारी सोपवण्यात येईल. त्यातून त्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध होईल, असे गडकरी म्हणाले.

6 लाख कोटींच्या बचतीचे प्रयत्न
जैविक इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देऊन पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या आयातीवर होणारा 6 लाख कोटी रुपयांचा खर्च वाचवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.