आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Gadkari Press Conference To Present Report Card Of Ministry

गडकरींनी मांडला लेखाजोखा, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, जलमार्ग यालाच प्राधान्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - नितीन गडकरी
नवी दिल्ली - पाणी पुरवठा, स्वच्छता याबरोबरच जलमार्गांचा विकास आणि वाहतूक व्यवस्था यावर आपल्या विभागाचे लक्ष असून त्या दृष्टीने व्यापक काम सुरू असल्याचे केंद्गीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले. आपल्या खात्याच्या 100 दिवसाच्या कामाचा आढावा सादर करण्यासाठी गडकरी यांनी दिल्लीत एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

गडकरी यांच्याकडे ग्रामविकास, पंचायत राज आणि पेयजल व स्वच्छता या खात्यांचा अतिरिक्त प्रभारही आहे. मंत्रालय वेगाने निर्णय घेत असून जोमाने काम करत असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले आहेत. यावेळी गडकरींनी आपल्या खात्याच्या कामाची माहिती देतानाच, आगामी वाटचालीबाबतही संकेत दिले.
पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, सौर ऊर्जेवर आधारीत यंत्रणेद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा विचार असून, त्यामुळे पाण्यासाठीची पायपीट बंद होणार आहे. माओवाद्यांचा प्रभाव असणा-या जिल्ह्यांमध्ये 3,248 सौर पंप लावले जातील असे त्यांनी सांगितले. तसेच या योजनेवर नियंत्रण ठेवण्यासाठीही स्वतंत्र यंत्रणा उभारली जाईल. स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर चळवळ उभारण्यासाठी कार्यक्रम आखला जात असून. स्वच्छठता आणि पाणी पुरवठा यावर प्राधान्यक्रमाने लक्ष दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आम्ही जहाज उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या माध्यमातून पर्यटनाचा विकासही होईल. जहाज बांधणीसाठी नियोजनबद्ध धोरण ठरवणे गरजेचे आहे. मुंबईतील पोर्टच्या विकासासाठी खास पॅकेज देण्यात येत असून. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये चार हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच बस पोर्टस् हे विमातळाप्रमाणे सर्व सुविधा असणारे असावे याची काळजी घेणार असल्याचेही गडकरी म्हणाले.
चांगली जलवाहतूक हा आपला प्राधान्यक्रम असून त्यामुळे जीडीपीमध्ये किमान 2% वाढ शक्य असल्याचे गडकरी म्हणाले. या नव्या सुविधेच्या माध्यमातून कमी प्रदूषण, कमी अपघात आणि कमी खर्च हे लक्ष्य गाठता येणे शक्य आहे. देशात उपलब्ध असलेल्या जलसाठ्यांचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोर्टस् तयार करण्याच्या दृष्टीने वेगाने काम सुरू असून, भूसंपादन पाण्याची उपलब्धता याचा अभ्यास सुरू असल्याचेही ते म्हणाले.
रस्त्यांबाबत माहिती देताना गडकरींनी सांगितले की, रस्त्याच्या जाळ्याचा विचार करता भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतात तब्बल 48 लाख किलोमीटरचे रस्त्यांचे जाळे आहेत. त्यामुळे रोज किमान 30 किमी मार्गाच्या विकासाचे ध्येय गाठले जात असल्याचे त्यांनी सांगितले.