आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nitin Gadkari To File Defamation Case Against Arvind Kejriwa

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केजरीवाल यांच्याविरोधात गडकरींनी दाखल केला अब्रु नुकसानीचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी दिल्लीतील पटियाळा हाऊस कोर्टात धाव घेत अब्रु नुकसानीचा खटला दाखल केला आहे. गडकरींनी आज याबाबत कोर्टात जाऊन दावा ठोकला.
केजरीवाल यांनी मागील महिन्यात देशातील भ्रष्ट नेत्यांचा पराभव केला पाहिजे असे आवाहन करीत त्यांनी काही नावे जाहीर केली होती. त्यात केजरीवालांनी गडकरींसह महाराष्ट्रातील अनेक नेत्यांची नावे घेतली होती. केजरीवाल यांच्या करामतीमुळे गडकरी चांगलेच संतप्त झाले होते. केजरीवालांनी तीन दिवसात जाहीर माफी मागावी, अन्यथा मानहाणीचा गुन्हा दाखल करू असा इशारा गडकरींनी दिला होता. मात्र, मागील 15 पंधरापासून केजरीवालांनी ना माफी मागितली ना खेद व्यक्त केला. उलट गडकरीसारखा भ्रष्ट नेता लोकसभेत येऊ नये म्हणून पक्षाच्या सदस्या अंजली दमानिया यांची उमेदवारी गडकरींच्या विरोधात जाहीर करून टाकली आहे. माफी न मागितल्याने गडकरींनी अखेर कोर्टात धाव घेतली आहे.
केजरीवाल यांनी 30 जानेवारी रोजी एका जनसभेत सुशीलकुमार शिंदे, पी. चिदंबरम, सलमान खुर्शीद, मायावती, मुलायम, सुरेश कलमाडी, शरद पवार, नितीन गडकरी, मायवती, मुलायम सिंह यादव, प्रफुल्ल पटेल, अनंत कुमार, वीरप्पा मोईली, एचडीकुमार स्वामी, कनीमोळी, जी के वासन, अनु टंडन, जगन मोहन रेड्डी, पवन बन्सल, फारूख अब्दुला, अवतार सिंह भडाना, ए. राजा, तरूण गोगोई आदी नेत्यांची यादीच जाहीर केली होती. केजरीवाल यांनी जनतेला आवाहन केले होते की, आगामी लोकसभा निवडणुकीत या नेत्यांना पराभूत करा.
काय म्हणाले होते अरविंद केजरीवाल- अरविंद केजरीवाल यांनी म्हटले होते की, आम आदमी पक्षाचे नेते मुख्यमंत्री, मंत्री आणि पंतप्रधान बनण्यासाठी नाही तर देशातील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी राजकारणात आलेले आहे. त्या सभेत केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीत भ्रष्ट नेत्यांना घरी बसविण्याचे आवाहन करीत अशा नेत्यांची यादीच जाहीर केली होती. लोकसभा निवडणुकीत आम आदमी भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात लढेल असे जाहीर करीत या नेत्यांना पराभूत करण्याचे आवाहन मतदारांना केले होते. त्यानंतर गडकरींनी केजरीवालांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा मानहाणीचा दावा दाखल करू असे म्हटले होते. त्यावेळी गडकरींबरोबरच काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला होता. दिग्विजय यांनी म्हटले होते की, केजरीवाल यांना सर्वच जण बेईमान दिसतात. ते आणि त्यांच्यासोबत असलेले लोक मात्र त्यांना प्रामाणिक दिसतात.