आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरी 8 दिवसांच्‍या अमेरिका दौ-यावर रवाना, सागरी वाहतुकीवर चर्चा करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतातील बंदर, जहाजबांधणीच्या क्षेत्राला गती देण्यासाठी अमेरिकी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात येणार आहे. त्यासाठी महामार्ग व रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले अाहेत. त्यांचा हा आठ दिवसांचा दौरा असेल.

या दौऱ्यात ते त्यांचे समकक्ष अँथनी फॉक्स यांच्याशी ते सोमवारी चर्चा करणार आहेत. त्यात देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी अमेरिकेला आवाहन करतील. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महामार्ग विकास करण्यासाठी गडकरी उत्सुक आहेत. त्यादृष्टीने अमेरिकेची मदत घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. फॉक्स यांच्यासोबत रस्ते सुरक्षा व पर्यावरण स्नेही इंधन, ऑटोमोबाइल, इलेक्ट्रिक वाहने इत्यादी क्षेत्रातही सहकार्याबाबत चर्चा केली जाणार असल्याचे महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले आहे. गडकरी या दौऱ्यात न्यूयॉर्क वाहतूक विभागाला भेट देतील. तेथील वाहतूक व्यवस्थापनाचा आढावा घेतील. शहरातील उद्योजकांशीदेखील ते चर्चा करतील. काही अमेरिकी कंपन्यांना भारतात गुंतवणुकीसाठी आमंत्रणही देणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय संंबंधाला बळकट केल्याने त्याचा फायदा देशाला होणार आहे.
जेएनपीटी, मुंबईचा समावेश
गडकरी यांच्या दौऱ्यात सागरी उद्योग क्षेत्राला गती देण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. त्यात जेएनपीटी, मुंबई, कांडला बंदर इत्यादी ठिकाणचे बांधकाम, जहाजबांधणी, सागरी वाहतूक, पायाभूत सुविधेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

मिसिसिपी नदी प्रकल्पाची पाहणी
सागरी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी गडकरी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात जगप्रसिद्ध मिसिसिपी नदीवरील बोट वाहतुकीचा अभ्यास करण्याचेही ठरवले आहे. त्या दृष्टीने भारतात काही गोष्टी करणे शक्य होऊ शकेल, असे त्यांना वाटते. भारतात २१२ बंदर, ७० किनारपट्टीवरील जिल्हे आहेत. १११ सागरी मार्ग आहेत.
बातम्या आणखी आहेत...