आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांची सुरक्षा वाढवून झेड प्लस करण्यात आली आहे. ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतरच गडकरींनी झेड प्लस सुरक्षा मागितली होती.
विशेष म्हणजे मुंडे यांच्या अपघाती मृत्यूला सहा महिने उलटल्यानंतर केंद्र सरकारने गडकरींना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यानंतर झेड प्लस सुरक्षा असलेले गडकरी हे मोदी मंत्रिमंडळातील दुसरे कॅबिनेट मंत्री आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली यांना झेड दर्जाची, तर उर्वरित मंत्र्यांना वाय दर्जाची सुरक्षा आहे. राज्यमंत्र्यांमध्ये जितेंद्र सिंह आणि किरण रिजिजू (गृह) यांना झेड प्लस सुरक्षा आहे. जितेंद्र सिंह यांच्याकडे तीन महत्त्वाची खाती आहेत.