आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण करण्यापेक्षा देशहिताचा विचार करा : नितीन गडकरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भूसंपादन विधेयकावर सोमवारी नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना कडक पत्राद्वारे प्रत्युत्तर देत राजकारण करण्यापेक्षा देशहिताचा विचार करा असा सल्ला दिला. गडकरी यांनी पत्रात म्हटले आहे की, लोकशाहीत जनहिताच्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला पाहिजे, त्यामुळे देशापुढे संपूर्ण स्थिती स्पष्ट होऊ शकते.
काँग्रेस आणि सहकारी पक्ष या विधेयका विरोधात आक्रमक आहेत. काँग्रेसने १९ एप्रिल रोजी रामलीला मैदानावर शेतकरी रॅलीचे आयोजन केले आहे. काँग्रेसचा विरोध पाहता केंद्रीय दळणवळणमंत्री गडकरी यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून यासंदर्भात चर्चा करण्याचे आवाहन केले होते. मात्र, सोनिया गांधी यांनी चर्चेची शक्यता फेटाळत मोदी सरकार हे उद्योगपतींना लाभ देण्यासाठी हा कायदा आणण्यात येत असल्याचा आरोप केला.
देशाचे १.७ लाख कोटींचे नुकसान

पत्राला प्रत्युत्तर देत गडकरी यांनी म्हटले की, या कायद्यात थोडेफार बदल करण्यात येतील; परंतु या कायद्यापासून मोदी सरकार पाऊल मागे घेणार नाही. काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील युवकांना काम नाही आणि शेतकरी आत्महत्या करीत आहेत. संपुआ सरकारने केवळ निवडणुकाचा लाभ मिळावा यासाठी देशाच्या विकासावर दुर्लक्ष केले. तुमच्याच सरकारमध्ये सर्वाधिक जमीन ही मोठ्या कंपन्यांमध्ये अधिग्रहित करण्यात आली आहे. त्यामुळे देशाला १.७ लाख कोटींचे नुकसान झाले.