आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरेना, बिहारमध्ये राजकीय पेच कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/पाटणा - बिहारमध्येआगामी विधानसभा निवडणुकीतील आघाडीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त जनता दल (जदयू) राष्ट्रीय जनता दलात (राजद) मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवरून सुरू असलेला पेच रविवारीही सुटला नाही. समाजवादी पक्षाचे नेते (सपा) मुलायमसिंह यादव यांच्या निवासस्थानी लालूप्रसाद यादव नितीशकुमार या दोघांची बैठक झाली. मात्र मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार, जागावाटप या मुद्द्यांवर अंतिम निर्णय होऊ शकला नाही.
समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये जनता परिवाराच्या विलीनीकरणाबाबत विधानसभा निवडणुकीनंतरच निर्णय होऊ शकेल. निवडणुकीतील जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी सहासदस्यीय समिती नेमण्यात आली असून यात दोन्ही पक्षांचे प्रत्येकी तीन सदस्य असतील. या सदस्यांची नावे नंतर जाहीर केली जातील. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल याचा निर्णयही नंतरच घेतला जाईल.
नितीश-राहुल भेट
बिहारचेमुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भाजपविरुद्ध धर्मनिरपेक्ष पक्षांची एकत्रित आघाडी मैदानात उतरवण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल मानले जात आहे. काँग्रेसचे अनेक नेते नितीश यांना पाठिंबा देण्याच्या मन:स्थितीत असून याबाबत चाचपणी करण्यासाठी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद सध्या बिहारमध्ये आहेत.

जागावाटपावरून मतभेद
राजदजदयूदरम्यान जागावाटपावरून असलेले मतभेद अजूनही कायम आहेत. जदयू नेते शरद यादव यांनी तीन दिवसांपूर्वी बिहारमध्ये राजद-जदयू काँग्रेस एकत्रित लढतील, असे वक्तव्य केले होते. दुसरीकडे लालूंनी आता ताणतणाव नकोत, असा सल्ला दिला होता. तर, नितीश यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे म्हटले होते.