आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नितीश कटाराच्या मारेकऱ्यांना शिक्षेत प्रत्येकी ५ वर्षे सूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने नितीश कटारा हत्याकांडातील दोषी विकास यादव, विशाल यादव आणि सुखदेव पहिलवान या आरोपींची शिक्षा ५ - ५ वर्षांनी घटविली आहे. न्यायालयाने सोमवारी विकास आणि विशालची शिक्षा ३० वरून कमी करून २५ वर्षे केली आहे. सुखदेवची शिक्षा २५ वरून २० वर्षे केली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने विकास आणि विशाल यांना खुनासाठी २५ वर्षे आणि पुरावे नष्ट करण्यासाठी अधिक ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. म्हणजे एकूण ३० वर्षे. याचप्रमाणे सुखदेवला २० वर्षे व ५ वर्षे ची शिक्षा झाली होती म्हणजे, २५ वर्षांची एकूण. उच्च न्यायालयाने सांगितले की, दोन्ही शिक्षा वेगवेगळ्या भोगाव्या लागतील. बाहुबली डीपी यादव यांचे सुपुत्र विकास यांच्यासह तिन्ही खुन्यांनी या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सांगितले की, १४ वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर सरकार यांना शिक्षेत सूट देऊ शकते. न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने या प्रकरणी सोमवारी शिक्षा सुनावली.

न्यायालयाचा निर्णय हा माझा विजय आहे : नीलम कटारा
विकास, विशाल आणि सुखदेव याने नितीश कटारा यांना २००२ मध्ये अपहरण करून जिवंत जाळले होते. नितीश यांची आई निलम यांनी म्हटले की, आम्ही खुन्यांच्या मरणाची शिक्षा मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने ते मान्य केले नाही. तरीही मी आनंदी आहे कारण नहे अपहरण व खुनाचे रेअरेस्ट ऑफ द रेअर प्रकरण होते,हे तर मान्य झाले.
बातम्या आणखी आहेत...