आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nitish Katara Murder Case: Vikas, Vishal Yadav Get Life Term

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कटारा हत्याकांड : बाहुबली नेत्याच्या मुलास जन्मठेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नितीश कटारा हत्याकांड प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बाहुबली नेता डी.पी. यादव यांचा मुलगा विकास आणि पुतण्या विशाल यादव यांच्या शिक्षेत वाढ केली. दोघांबरोबरच तिसरा दोषी सुखदेव पहिलवान यास शिक्षा वाढवून २५ वर्षांची जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तिघांनाही शिक्षेत सवलत मिळणार नाही. पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली पाच वर्षे कैदेची वेगळी शिक्षाही भोगावी लागेल.

न्यायमूर्ती गीता मित्तल आणि जे.आर. मिर्धा यांच्या विशेष न्यायपीठाने विकास आणि विशाल यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचा दंडही ठोठावला. तिघांनाही फासावर लटकवण्याची मागणी नितीशची आई नीलम कटारा व दिल्ली पोलिसांची होती. परंतु न्यायालयाने ती फेटाळून लावली. यािवरोधात नीलम कटारा सुप्रीम कोर्टात अपील करणार आहेत.

विकास यादवने १० ऑक्टोबर २०११ ते ४ नोव्हेंबर २०११ पर्यंत रुग्णालयात काही दिवस काढले. शिक्षेमध्ये या दिवसांचा समावेश नसेल, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. तुरुंगात असताना वारंवार रुग्णालयात जाणार्‍या कैद्यांची चौकशी करण्याचेही आदेश कोर्टाने दिले आहेत.

हत्याकांडानंतर डी.पी. यादवचे राजकारण संपले
नितीश कटारा हत्याकांडामुळे धर्मपाल (डीपी) यादव यांचे राजकारण संपुष्टात आणले. साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा डी.पी. यादव यांच्यावर आरोप आहे. डीपी एकेकाळी सपाप्रमुख मुलायमसिंह यादव यांचे निकटवर्तीय होते. ते बसपा आणि भाजपमध्येही होते. चार वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार होते. परंतु हत्याकांडामुळे २००४ मध्ये भाजपकडून आणि २०१२ मध्ये बसपामधून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यांना सपामध्ये जायचे होते. परंतु अखिलेश यांच्या जिद्दीमुळे त्यांना प्रवेश मिळाला नाही. २००७ मध्ये त्यांनी राष्ट्रीय परिवर्तन दलाची स्थापना केली. पश्चिम यूपीतील गाझियाबाद, गौतम बुद्ध नगर, बागपत, मेरठ, बुलंदशहर आणि बदायूंमध्ये त्यांचा विशेष जनाधार आहे.