आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitish Kumar And Mamata Banerjee May Get Huge Success

लोकसभा निवडणूक; द हिंदूच्‍या सर्वेक्षणात नितीशकुमार, ममता आघाडीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लोकसभेच्या निवडणुका आज घेण्यात आल्या तर बिहारमध्ये नितीशकुमार यांचा जदयू आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस प्रचंड मोठ्या आघाडीवर राहतील. हा निष्कर्ष आहे सीएनएन-आयबीएन आणि द हिंदूने केलेल्या एका सर्वेक्षणाचा. या सर्वेक्षणातून काढण्यात आलेल्या निष्कर्षानुसार, एनडीएमध्ये फूट पडल्यानंतर बिहारमध्ये जदयू 25 टक्के मते घेऊन सर्वात आघाडीवर राहील. लालूप्रसाद यादव यांच्या राजदला 24 टक्के, तर भाजपला केवळ 22 टक्के मते मिळतील. जदयूला 15 ते 19 जागा मिळतील, तर राजद- भाजपला 8 ते 12 जागा मिळतील. नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी यांना स्वीकारायला पाहिजे होते, असे बिहारच्या 38 टक्के लोकांना वाटते. एनडीएमध्ये फुटीला बिहारमधील 33 टक्के लोक जदयूलाच जबाबदार धरतात. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 33 टक्के मते मिळतील, असा या सर्वेक्षणाचा अंदाज आहे. तृणमूलला लोकसभेच्या 23 ते 27 जागा मिळू शकतात, तर डाव्या पक्षांना 7 ते 11 जागा मिळू शकतात.

जनमत चाचण्यांवर बंदी : दरम्यान, निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर जनमत चाचण्यांवर बंदी घालण्याच्या आपल्या प्रस्तावाला केंद्रा सरकार मंजुरी देईल, याबाबत लवकरच नियमात दुरुस्तीही केली जाणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होत असताना आणि मतदानाच्या शेवटचा टप्पा
सुरू असताना जनमत चाचण्या प्रसिद्ध किंवा प्रक्षेपित करण्याच्या प्रस्तावाला अ‍ॅटर्नी जनरलनी पाठिंबा दिल्यामुळे निवडणूक आयोगाच्या याबाबतच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.